*नागपूर -औरंगाबाद महामार्गावर १७ टन गॅसचा टँकर उलटला*

0
2127

शहजाद खान- अमरावती :-

नागपूर -औरंगाबाद महामार्गावर अमरावती जिल्ह्यातील देवगांवजवळ मुंबईहून खापरीकडे १७ टन गॅस घेऊन जाणारा टँकर पलटी होऊन गॅस गळती सुरू झाली होती. स्फोट होण्याच्या भीतीने या मार्गावरील वाहने दूरवरच थांबल्याने तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांची रांग लागली होती. ही घटना बुधवारी पहाटे ६.३० दरम्यान घडली.