नरखेड तालुक्यातील गायमुख ( पांढरी ) येथे ४३०० वृक्षांची लागवड – पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून  श्रमदान करून केली वृक्षलागवड !

0
1040
Google search engine
Google search engine

गावकरी व शाळेतील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग !

श्रमदानातून केली १५०० झाडांची रोपवाटिका तैयार !

रुपेश वाळके / विशेष प्रतिनिधी –

पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धे दरम्यान गायमुख पांढरी येथे १५०० झाडाची रोप वाटिका श्रमदानातून तयार करण्यात आली आणि सम्पूर्ण महाराष्ट्रात वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या ७५ तालुक्यातील गावा-गावा मध्ये स्पर्धेच्या निमित्याने गावकऱ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून तयार केलेल्या रोप वाटिकेतील रोपे लावून वृक्ष लागवड करण्याचे आवाहन पानी फाउंडेशन टीम तर्फे करण्यात आले होते त्यानुसार जिल्हा परिषद् प्राथमिक शाळा गायमुख पांढरी येथील शिक्षक , विध्यार्थी व गावातील महिला,पुरुष व् लहान मुलांनी गावामध्ये वृक्ष दिंडी काढून मोठ्या उत्साहात वृक्ष लागवड केली व् या झाडांची देखभाल करण्याची जबाबदारी सुद्धा गावातील ग्रामस्थानी व् शाळेतील मुलांनी घेतली.

नरखेड तालुक्यात पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून गायमुख पांढरी येथील जंगल परिसरात ४५०० झाडांची लागवड करण्यात आली त्यामध्ये सीताफळ , आवळा , जांभूळ , सिरस , बोर , करंज , कडुलिंब , रेनट्री , यासह विविध प्रकारचे झाडे लावण्यात आली , या भव्य वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये गायमुख येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी , गावकरी मंडळी , यासह विविध संघटनांनी सक्रिय सहभाग घेऊन भव्य वृक्ष लागवड कार्यक्रमात श्रमदान करून वृक्ष लागवड केली .

पानी फाउंडेशनतर्फे वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ गायमुख पांढरी येथे विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. गायमुख येथील सरपंच सुमन नारनवरे , तंटामुक्त समिती अध्यक्ष रामनाथ पानोरे , ग्राम पंचायत सदस्य ओमप्रकाश खोजरे , जी प शाळेतील शिक्षक स्मिता अकर्ते , श्रीकांत पावडे , रोशनी सूर्यवंशी , जोत्सना नारनवरे , श्यामसुंदर खोजरे , कृपाल खेरोने , जितेंद्र सूर्यवंशी , लखन सूर्यवंशी , सिद्धार्थ सोमकुवर , जयदेव कुमरे , गजानन युवणाती ,मधुकर युवणाती , पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयाक रुपेश वाळके , हेमंत पिकलमुंडे , अतुल तायडे यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थी, विद्यार्थीनी अनेक पदाधिकारी, अधिकारी –कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते , गावकरी मंडळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होती .

महाराष्ट्रात १९७२ नंतरचा सर्वात भिषण दुष्काळ सध्या जानवू लागला आहे. दुष्काळ हा निसर्ग निर्मित नसून मानवाच्या नियोजन शून्य कृतिचा परिणाम आहे असे बोलले जात आहे. दुष्काळ निवारण आणि महाराष्ट्राचा समृध्द शाश्वत विकास करण्यासाठी वनलागवडीच क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात अनेकदा वृक्षलागवडीचे कार्यक्रम राबविले गेले, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलव्याप्त क्षेत्र ३३ टक्के असणे गरजेचे आहे. या महत्वाच्या वन संपत्तीचे संरक्षणाअभावी महाराष्ट्रातील वृक्षतोड आणि जंगलावरील अनाधिकृत अतिक्रमण यामुळे राज्यात आवर्षण, तापमान वाढ, क्लायमेट चेंज, पाणी टंचाई, दुष्काळ सासारखे संकट वाढत आहे किंबहूना वाढले आहे. याकडे त्वरीत गांभीर्याने न पाहिल्यास येत्या काही वर्षात महाराष्ट्रात वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी वृक्ष आणि वन याच महत्व संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षापूर्वी त्यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगाच्या माध्यमातून सांगीतले आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली तर महाराष्ट्रात भेडसावू लागलेले संभाव्य धोके रोखण्यात मानवाला यश मिळेल आणि त्यातूनच चिरंतन शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल. त्यासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सकारात्मक पावले उचलून गायमुख येथे ५५०० वृक्ष लागवड करून वृक्ष जगविण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे.

गेल्या काही वर्षापूर्वी महाराष्ट्रातील डोंगरपट्यावर वृक्षलागवडी झाल्या आणि त्याच्या संवर्धन, संरक्षणाची जबाबदारी आपन घेऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे . वनसंपदा आणि नैसर्गिक साधनसंपत्ती ही जीवसृष्टीला लाभलेली देणगी आहे. जंगलसंपदा ही मानवी संपत्ती आहे तेंव्हा ‘वनश्री हीच धनश्री। वृक्ष लावू घरोघरी।।’ हा ध्यास प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. वनसंवर्धन व संरक्षण यासाठी प्रभावी उपाय योजना करण्याची काळजी घेण्यासाठी ठोस उपाययोजना करून वृक्ष जगविण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे .