निफाडच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध : आ.अनिल कदम

0
1396
Google search engine
Google search engine

निफाड प्रतिनिधी :- समाधान कोकाटे

नवनिर्मित नगरपंचायत सहाव्वाभुत निधीतुन निफाड नगरपंचायतीमधील विविध प्रभागांतील विकासकामांचे शनिवारी दि.४ रोजी निफाड तालुक्याचे आमदार अनिल आण्णा कदम यांच्या हस्ते भुमीपुजन करण्यात आले. या दरम्यान भुमीपुजन झाल्यानंतर शनि महाराज चौकात झालेल्या सभेत बोलताना आनिल कदम म्हणाले निफाड येथील तालुका क्रीडा सकुल व अॉल कंपाउंड जिनिंग ट्रक,निफाड-पिपळगाव बसवंत रस्ता तसेच तालुक्यातील इतर रस्ते यासाठी भरीव निधी आपण मंजूर करून आणला असून निफाड शहरातील उर्वरित नगर व उपनगरातील रस्ता तसेच सवार्गिण विकाससाठी मी प्रयत्नशील आहे तसेच निफाड शहरातील विकासकामांना निधी मंजुरीसाठी माजी नगरध्यक्ष मुकुंदराजे होळकर व शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनीही प्रयत्न केले आहेत निफाडच्या विकासासाठी भरीव निधी देण्याची ग्वाहीदेखील यावेळी आनिल कदम यांनी दिली.

या वेळी निफाड शहरातील अहिल्यादेवीनंतर गणेशनगर,लक्ष्मीनगर,संगमेश्वर कॉलनी,अपर्णा सोसायटी पेठ गल्ली आदी नगरांमध्ये विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा शनिवारी दी.४ रोजी शिवसेनेच्या वतीने आयेजित करण्यात आला होता. या वेळी श्री विठ्ठल मदिंर ते शनि चौकापर्यंतच्या रस्ता कॉक्रिटीकरणाचे भुमीपुजन झाले.

या प्रसंगी निफाड नगरपंचायतीचे माजी नगरध्यक्ष मुकुंदराजे होळकर नगरसेवक किरण कापसे,जावेद शेख,आनंद बिवालकर,सदीप जेऊघाले,नगसेविका सनितां कुंदे, लक्ष्मी पवार,मोनाली वाघ,शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड,उपातालुकाप्रमुख इरफान सैयद,शिवसेनच्या निफाड शहर महिला आघडी अध्यक्ष अरुण कराड,भाजपचे शंकरराव वाघ,राष्ट्रवादी कॉग्रसचे सागर कुंदे,राष्ट्रवादी कॉग्रेसचे विक्रम रंधवे, अँड नाभा.ठाकरे,अँड इंद्रभान रायते,अभिजीत चोरडिया, मनोज लुंकड,एन एल जाधव,कांतीकाका कायस्थ, कृष्णा कायस्थ,पराग कराड,यंशवत शिंदे,बाबुभाई मणियार,बापु कापसे,किरण कासव,तुकाराम उगले,अकिला भाभी.आदीसह शहरातील नागरिक उपस्थित होते.