चांदापूर ते रूपानगरतांडा रस्ता कधी पुर्ण होणार.

0
758
Google search engine
Google search engine

परळी वैजनाथ(प्रतिनिधी)

तालुक्यातील चांदापूर(पोचमाई)ते रूपानगरतांडा मार्गे वसंतनगरतांडा रस्त्याचे काम टेंडर निघुनही होत नसल्याने या रस्त्याने येण्या,जाण्यास गावकऱ्यांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत असुन सदर रस्त्याचे काम लवकर करावे अश्या मागणीचे निवेदन रूपानगरतांडाचे रहिवाशी प्रभु चव्हाण व इतर 44जणानी सा.बा.विभागकडे दिले आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की सा.बा.विभागाच्या वतीने चांदापुर ते रूपानगरतांडा मार्गे वसंतनगर तांडा या अंदाजे 700ते800मिटरच्या रस्त्याचे डांबरी करण करण्याचे अंदाजे चौदा लाख रूपयाचे टेंडर काढण्यात आले त्याला बराच कालावधी उलटला असुन गुत्तेदाराने रस्त्यावर मुरूम व थोडी फार खडी अंथरून ठेवली असुन डांबरी करण केले नाही तसेच रस्त्यावर येणाऱ्या पुलाचे काम सुध्दा फक्त सिमेंटचे पाईप टाकुन त्यावर माती टाकुन केले आहे. या रस्त्याने 200शेतकरी व विद्यार्थी यांचे दररोज पायी जाने येने असुन आता पावसाळ्यात रस्त्यावर चिखल झाल्याने चालनेही कठीण होत आहे तर मोटार सायकलने येणे,जाने धोकादायक झाले आहे. या रस्त्याची हि दयनिय अवस्था अनेक वर्षापासुन असुन आज चौथी पिढी हा त्रास सहन करीत आहे.या अगोदरही या रस्त्याच्या कामाचे टेंडर तीन,चार वेळेस काढण्यात आले असुन काम मात्र कागदोपत्री करून बिले उचलली गेली असल्याचा आरोप प्रभु चव्हाण यांनी केला असुन आता तरी या रस्त्याचे डांबरी करण करावे अश्या मागणीचे निवेदन ना.पंकजाताई मुंडे .विरोधीपक्षनेते ना.धनंजय मुंडे.सा.बा.विभाग अंबाजोगाई,तहसिलदार,पं.स.बी.डी.ओ.
ग्रामिण पोलीस स्टेशन,काँग्रेसचे वसंत मुंडे यांना दिले असुन त्यावर 44 जणाच्या सह्या आहेत .सदर रस्त्याचे काम न झाल्यास सा.बा.वि.अंबाजोगाई कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे प्रभु चव्हाण यांनी सांगितले आहे.