अकोट शहर पोलिसांनी अवैध दारू विक्री व्यवसाय करणाऱ्या दोघांना पकडले

0
777

आकोट(प्रतिनिधी)- आकोट शहर पोलिसांनी अवैध दारू विक्री व्यवसाय करणाऱ्या दोन इसमाना पकडून एकूण 35720रु चा माल केला जप्त केला.
प्राप्त माहीत नुसार शहरात प्रभावी पोट्रोलिंग करून त्या दरम्यान अवैद्य दारू विक्रेत्या वर लक्ष केंद्रित करून आज दि 05/08/2018 संध्याकाळी कालंका चौक जवळ तसेच कबुतरी मैदान येथे विना परवाना देशी दारू चे एकूण 90ml चे 200 क्वार्टर्स कि. 5720रु व एक मोटार सायकल की अंदाजे 30000 असा एकूण 35720रु चा घेऊन जाताना 1) प्रवीण लक्ष्मन धांडे वय38 रा खानापूर वेस अकोट २) ललित केवलचंद सराफी वय 26 वर्ष रा दखनी फैल अकोट यांना पेट्रोलिंग दरम्यान पकडले असुन याप्रकरणी पोलिसांनी अप न 268/18 तसेच 269/18 क 65 इ म दा का प्रमाणे गुन्हा दाखल केला .
सदर कार्यवाही ही पो नि गजानन शेळके यांचे मार्गदर्शन खाली डी बि चे स पो नि फड व ना पो का जितेंद्र कातखेडे पो को राहुल वाघ संतोष गावंडे मंगेश खेडकर शेख नासिर यांनी केली