सिरोंचा शहरासाठी प्रस्तावित असलेल्या BSNL चे दोन नवीन टॉवर उभारून 3G इंटरनेटची स्पीड वाढवा @BSNLCorporate @BSNL_MH @cgm_mh_bsnl

0
764

माजी उपसरपंच रवी सल्लम यांची मागणी
जे.टी.ओ.गडचिरोली यांना निवेदन सादर

*सिरोंचा*

.सिरोंचा शहरासाठी दोन नवीन बी.एस.एन.एल. टॉवर उभा करण्याची प्रस्ताव असून त्या प्रस्तावाची तांत्रिक मंजुरी व अडथडा दूर करून शहरात लवकर प्रस्तावित दोन्ही ठिकाणी टॉवर उभारून दोन्ही टॉवरला थ्री -जी इंटरनेट सेवेने जोडून शहरातील काही प्रभागात मोबाईल धारकांना अद्यापही टू-जी स्पीड येत असून या प्रभागांमध्ये थ्री -जी स्पीड वाढवण्याची मागणी सिरोंचाचे माजी उपसरपंच रवी सल्लम यांनी केली आहे.
शनिवारी येथील बी.एस.एन.एल.चे अभियंता रविकुमार यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या मार्फतीने जे.टी.ओ.गडचिरोली यांच्याकडे निवेदनही पाठविले आहे.
जे.टी.ओ.गडचिरोली यांना पाठविलेल्या निवेदनात,सिरोंचा शहरात आजही मन्नेवार मोहल्ला प्रभाग क्रमांक 3, कलार मोहल्ला (छोटा बाजार) सिद्देश्वर मंदिर परिसर, ग्रामीण बँक, को -ऑफ- रेटिव्ह बँक परिसर तसेच ग्रामीण रुग्णालय व वनविभाग या परिसरात बी.एस.एन.एल.ची.थ्री-जी इंटरनेट सेवा कनेक्ट होत नसून या परिसरातील मोबाईल धारकांना फक्त टू-जी इंटरनेट सेवा कनेक्ट होत असून पाहिजे त्या प्रमाणात स्पीड नाही राहत आहे. त्यामुळे या प्रभागातील बी.एस.एन.एल.ची मोबाईल वापर करणाऱ्यांना थ्री -जी इंटरनेट सेवे पासून वंचित राहावे लागत आहे.
येथील दूरसंचार विभागाचे कनिष्ठ अभियंता रविकुमार यांची कार्यालयात शनिवारला भेट घेऊन चर्चा करतांना माजी उपसरपंच रवी सल्लम यांनी म्हंटले कि, सिरोंचा शहरासाठी बी.एस.एन.एल.मोबाईल टॉवर शहरात ऍड.शिवाजी तोटावार यांच्या घराजवळ तर सिरोंचा माल येथे पाण्याची टाकीजवळ एक टॉवर असे दोन नवीन टॉवर ची प्रस्तावित असून हे दोन्ही टॉवर ची तांत्रिक मंजुरी घेऊन लवकर टॉवर उभारून या टॉवरला थ्री -जी इंटरनेट सेवा कनेक्ट केल्यास या परिसरातील बी.एस.एन.एल.मोबाईल वापर करणाऱ्या धारकांना अधिक सोयीचे होईल म्हणून चर्चा केली.

सिरोंचा शहरात एकही खाजगी मोबाईल टॉवर नसल्याने या शहरातील हजारो मोबाईल धारकांना फक्त बी.एस.एन.एल.मोबाईल टॉवर वर अवलंबून राहावे लागत असून दूरसंचार विभाग मात्र आपल्या ग्राहकांना योग्य सेवा देण्यात अपयशी ठरत आहे.