परळी तालुक्यातील हातची आलेली पीके जाण्याची शक्यता; शेतकरी चिंतेत.

0
728

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-

परळी तालुक्यातील व परिसरात सुरुवातीला पाऊस चांगला पडल्यामुळे पण पुन्हा पाऊसाने मोठी उघाड दिल्यामुळे शेतकर्यांचे हातात आले पिक सुकु लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
गेल्या महिन्यापासून पाऊसाचा थेंब पडला नाही. सोयबीनसह इतर पिकांनी माना टाकल्याचे सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच कापसावरही बोंडअळी पडली आहे. शेतकऱ्यांना बँके कडून तसेच हात उसणे पैसे उचलून पेरणी केली होती. आता पिकांनी माना टाकल्यामुळे आलेले पिक उपटून टाकायची वेळ आली आहे. पाऊस नाही पडलातर पुढील रब्बी हंगामातील पेरणी देखील शेतकऱ्यांना करणे आवघड आहे. अशी परिस्थिती राहिली तर पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण होऊ शकते. शासन ही शेतकर्यांसाठी ठोस निर्णय घेत नसल्यामुळें शेतकरी दुद मनस्थती मध्ये पडला आहे. शेतकर्यांना जगावे की, मरावे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शासनाचे कुठलेच अनुदान वेळेवर मिळत नाही. शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो त्या शेतकर्यांकडे शासन दरबारी कोणाच निर्णय घेतला जात नाही. शेतकर्यांचा फक्त मतदानापुर्ताच उपयोग केला जातो असा सुर देखील निघत आहेत. बळीराजाच्या मुलांना देखील शेतीला जोडधंदा उभारण्यासाठी बँका कर्ज देत नाहीत. अन् अधिकारी देखील उडावाउडवीचे उत्तर देत असतात. निसर्गाने पण शेतकर्यांना साथ नाही दिलीतर शेतकर्यांवर आत्महत्या करण्याशिवाय प्रर्याय नाही. परळी तालुक्यातील व आजुबाजुच्या परिसरात चार दिवसात जर पाऊस नाही पडला तर हातची आले पीके वाया गेल्या शिवाय राहणार नाहीत. परिसरात सध्यातर दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी माहिती भागवत माणिकराव मुंडे शेतकरी, तळेगाव,ता.परळी वैजनाथ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

जुनच्या पहिल्या आठवड्यात खरीपाची पेरणी सुरुवात करण्यात आली होती. पेरणीसाठी चार हजार, खत आणि बियाणे चार हजार, खुरपणी कोळपणी तीन हजारे एकरी खर्च करण्यात आला आहे. तरी पाऊसाने उगाड दिल्यामुळे आले पिके देखील हातची जाण्याची शक्यता आहे.

महादेव तुकाराम मुंडे, पै.दगडु प्रभू मुंडे, मेघराज मुंडे, किशन मुंडे, मुरलीधर गणपत मुंडे, शिवाजी चव्हाण, महेश मुंडे, शाम मुंडे, हनुमंत मुंडे, वैजनाथ चव्हाण, नरहारी मुंडे आदी शेतकर्यांना आपल्या व्यथा आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितल्या.

आधीच अडचणीत असलेल्या शेतकर्यांनी सुरुवातीलाच मोठ्या कष्टाने बँका व हात उसने पैशाची तरदुद करून पेरणी केली होती. आता पाऊस जर नाही पडलातर शेतकरी आथिर्क संकटात सापडून त्याला पुन्हा खाजगी सावकरांची दरवाजे ठोकण्याची वेळ येऊ शकते. पाऊस न झाल्याने आलेली पिके आता माना टाकु लागली आहेत.

भागवत माणिकराव मुंडे
शेतकरी, तळेगाव,ता.परळी वैजनाथ

परळी तालुक्यातील कपाशीची लागवड केली आहे. गतवर्षी बोंड अळीमुळे शेतकर्यांचे नुकसान झाले होते. यावर्षीही बोंड आळीचा प्रादुर्भाव होतांना दिसत आहे. शेतकऱ्यांचे डोळे सध्या तरी पाऊसाकडे लागले असुन शेतकरी संकटात सापडल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहेत. कृषि विभागाने किड नियंत्रण व पिके सुकु नयेत म्हणून मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.

मारोती सातपुते
शेतकरी नाथ्रा,