अकोट शहर पोलिसांनी पकडला दहा हजार रुपये किंमतीचा अवैध गुटखा

145

अकोट (प्रतीनिधी)-अकोट शहर पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा जप्त केल्या नंतर अवैध गुटख्या विरुद्ध कारवाई सुरूच ठेवली असून आज दिनांक 7।8।18 रोजी परत 10,000 रुपये किमतीचा गुटखा व 30,000 रुपये किमतीची मोटर सायकल असा एकूण 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात शहर पोलीसांना यश आले आहे. पोलिस सूत्रा कडून प्राप्त माहिती नुसार अकोट शहर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील संजय घायल, गोपाल अघडते, राकेश राठी, सुल्तान पठाण ह्यांना मिळालेल्या माहिती वरून त्यांनी पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली नवगजी प्लॉट येथे दबा धरून बसले असता ,मिळालेल्या माहिती प्रमाणे रफिक पान सेंटर जवळ सैय्यद फिरोज अली सैय्यद अब्बास अली रा कंगारपुरा हा होंडा शाहीन MH 30 AQ 4923 ह्या मोटर सायकल ने महाराष्ट्र सरकार ने प्रतिबंधित केलेला गुटखा व पान मसाला वाहून नेत असतांना मिळून आल्याने त्याची चौकशी केली असता मोटर सायकल ला बांधलेल्या मोठ्या बोरी मधून वेगवेगळ्या ब्रँड चा गुटखा व पानं मसाला मिळून आल्याने 10,000 रुपये किमतीचा गुटखा व पान मसाला व 30,000 रुपये किमतीची मोटर सायकल असा एकूण 40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, सदर ची कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ,पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन अकोट शहर च्या गुन्हे शोध पथकाने केली, अकोट शहर पोलिसांच्या धाड सत्र मुळे गुटखा माफिया धास्तावले आहेत.