सावंगा (विठोबा) येथील आरोपीस सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा – चांदूर रेल्वे दिवानी न्यायालयाला निकाल

0
767
Google search engine
Google search engine
बकऱ्या चारण्याच्या वादावरून कुऱ्हाडीने मारहाण प्रकरण
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
तालुक्यातील सावंगा (विठोबा) येथील बकऱ्या चारण्याच्या वादावरून कुऱ्हाडीने मारहाण प्रकरणात चांदूर रेल्वे येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधिश एस. सी. खैरनार यांनी आरोपीस सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
सविस्तर माहितीनुसार, चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा (विठोबा) येथील आरोपी आनंदा दशरथ सुर्यवंशी (वय ६०) यांनी गावातीलच फिर्यादीस बकऱ्या चारण्याच्या वादावरून कुऱ्हाडीने पाठीवर मारून जखमी केले होते. आरोपीविरूध्द कलम ३२६, ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरण दिवानी न्यायाधिश एस. सी. खैरनार यांच्या न्यायालयात सुरू असतांना कलम ३२४ मध्ये आरोपीचा दोष सिध्द झाल्याने आरोपी आनंदा सुर्यवंशी यांना सहा महिने सक्त मजुरी व ३ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. सरकारी पक्षातर्फे ए. डब्लु. जुनघरे यांनी तर आरोपीचे वकील म्हणुन ललित कदम यांनी काम पाहिले. या प्रकरणात तपासी अंमलदार हे.कॉ. गजानन साबळे हे होते व पैरवीचे काम सुरेंद्र वाकोडे यांनी केले.