चांदूर रेल्वे जि.प. शाळेत साठे जयंती व टिळक पुण्यतिथीचे आयोजन

0
624
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
   स्थानिक जि. प. माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अशोक इंगळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन श्रीमती खेरडे, श्रीमती देशमुख, श्री. बावने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
    प्राचार्य इंगळे यांनी आपल्या भाषणातुन टिळकांची चतसुत्री विद्यार्थ्यांना समजावुन सांगितली. तर अतिथी मान्यवरांनी दोन्ही विभुतींच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला. यानंतर विद्यार्थ्यांची सुध्दा भाषणे झाली. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन १० (अ) च्या विद्यार्थ्यांनी केले होते.