परळीत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा श्रावणमास तपोनुष्ठान सोहळा नेत्रदिपक होणार-चेतन सौंदळे

0
1501

श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट, लिंगायत समाज व भक्तगण सोहळ्याच्या तयारीसाठी सरसावले

आरोग्य तपासणी शिबीर, मोफत वैद्यकीय सल्ला, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, अखंड शिवनाम सप्ताह, सांस्कृतिक कार्यक्रम होणार

पत्रकार परिषदेत तपोनुष्ठान समितीची माहिती

परळी दि.08

श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट, लिंगायत समाज व भक्तगण परळी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावणमास तपोनुष्ठान निमित्त राष्ट्रसंत, वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांची 11 ऑगस्ट रोजी रथातुन मिरवणुक व भव्य शोभा यात्रा परळी शहरातील विद्यानगर भागातील श्री. शंभु महादेव मंदिरापासुन निघणार आहे. 12 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर दरम्यान येथील वैद्यनाथ मंदिराच्या पुर्वमुखी पायर्‍या समोरील प्रांगणात श्रावण मास तपोनुष्ठान होणार आहे. यानिमित्त आरोग्य शिबीर, भजन, प्रवचन, अखंड शिवनाम सप्ताह, परमरहस्य पारायण व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अशी माहिती श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत दिली.
स्वयंभु ज्योतिलिर्ंंग प्रभु वैद्यनाथ पुण्यक्षेत्रीय परळी वैजनाथ येथे राष्ट्रसंत वसुंंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे वयाच्या 103 व्या वर्षातील 82 वे श्रावणमास तपोनुष्ठान आहे.
राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या परळी येथील 21 दिवशीय श्रावणमास तपोनुष्ठान सोहळ्यास सर्वश्री ष.ब्र.108 सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा, शिवाचार्य महाराज वसमत, करबसव शिवाचार्य महाराज वसमत, श्रीसिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरा, श्री विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मन्मथधाम, शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीर, निलकंठ शिवाचार्य महाराज धारेश्‍वर, श्री दिगांबर शिवाचार्य महाराज वसमत, श्री सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदा, श्री शंभुलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाई, श्री नंदिकेश्‍वर शिवाचार्य महाराज सोनपेठ, श्री गुरुपाद शिवाचार्य महाराज गिरगाव, श्री विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड, श्री महालिंगेश्‍वर शिवाचार्य महाराज बर्दापुर, श्री शंकरलिंग शिवाचार्य महाराज शिरुर अनंतपाळ यांची उपस्थिती लाभणार आहे.

वैद्यनाथ मंदिर परिसरातील पार्कींग स्थळी भव्य वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आला आहे. तसेच वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने याठिकाणी दोन खोल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. याठिकाणी ष.ब्र.डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज हे मौन तपोनुष्ठान करणार आहेत. 12 ऑगस्ट पासुन मौन तपोनुष्ठानास सुरुवात हाणेार आहे. व 02 सप्टेंबर रोजी मौन मुक्ती व समारोप होणार आहे. भव्य रॅली, उद्घाटन, समारोप या कार्यक्रमास मंत्री मंडळातील सदस्य, विविध पक्षातील नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या ग्रामविकासमंत्री ना.पंकजाताई मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे हे या तपोनुष्ठान सोहळ्यासही विशेष लक्ष देऊन उपस्थिती दर्शविणार आहेत.
डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी स्वातंत्र्यपुर्वकाळात लाहोर येथुन वैद्यकीय शास्त्राची एम.बी.बी.एस.ही उच्च पदवी संपादन केली आहे. त्याअनुषंगाने या सोहळ्यात आरोग्य तपासणी शिबीर व नामवंत तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व सल्ला मोफत दिला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी व्यक्तीमत्व विकास व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर, अखंड शिवनाम,परमरहस्य पारायण, भजन किर्तन, प्रवर्चन आदी धार्मिक कार्यक्रम, वृक्षारोपण व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. शिवतांडव, शिव भजन तसेच संगित मेजवाणीचे आयोजन करण्यात आले आहे. असेही चेतन सौंदळे यांनी सांगितले.

तसेच रविवारी 12 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध या विषयावर नामवंत वैज्ञानिक संशोधक प्रा.डॉ.जगन्नाथ दिक्षित यांचे आरोग्य मार्गदर्शन होणार आहे.
श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख, विश्‍वस्त विजयकुमार मेनकुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी घेतलेल्या या पत्रकार परिषदेस माजी नगरसेवक सोमनाथ निलंगे, चंद्रकांत उदगीरकर, संतोष पंचाक्षरी, अ‍ॅड.गिरीष नरवणे, रमेशअप्पा सपाटे, सोमनाथ गोपनपाळे, अशोक नावंदे, श्रीकांत ढेले, ओमप्रकाश बुरांडे, संजय खाकरे, सदानंद चौधरी, मकरंद नरवणे, अरविंद चौधरी, कैलास रिकिबे, राजाभाऊ हलकंचे, मन्मथ नरवणे, संजय कोरे, शिवशंकर नाईक, रमेश काळे, बाबासाहेब चौधरी, अनिल चौधरी, रमेश चौधरी सर, राजाभाऊ नरवणे, प्रा.अमर आलदे, योगीराज बर्दापुरे, चंदुअप्पा हालगे, बबनराव शेटे, दयानंद चौधरी, वैजनाथ निलंगे आदि उपस्थित होते.
परळी शहरातील वैद्यनाथ मंदिराच्या नवीन इमारतीत मोफत आरोग्य तपासणी शिबीरामध्ये हाडांची ठिसुळपणा मोजणे, दमा तपासणी, कोलेस्ट्रॉल, हेमोग्लोबीण, मधुमेहची तपासणी केली जाणार आहे. तसेच लाईफेकेअर हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर उदगीरच्या वतीने मोतीबिंदु, मुतखडा, अ‍ॅन्जिओप्लास्टी, बायपाससर्जरी, लघवीला त्रास, डायलिसिसची नाव नोंदणी परळी येथे करुन मोफत उदगीर येथे सेवा दिली जाणार आहे.
श्रावणमास तपोनुष्ठान दरम्यान भाविकांना दररोज महाप्रसदाची सोय करण्यात आली आहे. नगर परिषदेनेही मंदिर परिसरात स्वच्छता व रोड दुरुस्तीचे काम, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे.