जिल्हाधिकारी, कृषी अधिकार्यांच्या तत्परतेमुळे ८४ गावातील बोंडअळी नियंत्रणात.

0
738

बुलढाणा जिल्ह्यातील ८४ गावात १.७२ लाख हेक्टर क्षेत्रावर शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापुस पीक धोक्यात आले होते. मात्र, जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यतत्परतेमुळे बोंडअळी नियंत्रणात आणण्यात कृषी विभागाला यश आले आहे. मागीलवर्षी शेंदरी बोंडअळीमुळे कापुस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. यावर्षीही महिन्याभरापासून जिल्ह्यातील ८४गावात कापुस पिकावर शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र, कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे व जिल्हा कृषी अधिक्षक एन. एम.नाईक यांनी तात्काळ उपाययोजना केल्यामुळे शेंदरी बोंडअळीचा प्रादर्भाव नियंत्रणात आला आहे.जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिक्षक यांनी गावागावात जाऊन पाहणी करुन अधिकारी कर्मचार्यांच्या कार्यशाळा घोतल्या. शेतकर्यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. उपाययोजना म्हणून कामगंध सापळ्याची उभारणी केली. त्याचबरोबर जिल्ह्यात ७०३४ लिटर क्लोरोपायरीफॉस व एक वेळेस निंबोळी अंक याची अदलून बदलून फवारणी केली. त्याचबरोबर लाईटटॅप लावले. यासाठी ४८१अधिकारी कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. त्यामुळेच शेंदरी बोंडअळी नियंत्रणात आली आहे.