जोला येथे राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

0
729
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी : –

मौजे जोला ता.केज येथे आज दि.10/08/2018 रोजी जि.प.प्रा.शाळा हनुमाननगर जोला, जि.प.प्रा.शाळा जोला व अंगणवाडी क्र.1 व अंगणवाडी क्र.2 मध्ये मुलांना वय वर्ष 1 ते 19 जंतनाशक गोळी खाऊ घालण्याची मोहिम राबवायली.यावेळी आशाताई ढाकणे यांनी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमीत्त गोळ्या खावु खालण्याचे फायदे सांगताना
जंताचा बालकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम हा बालकांना रक्तक्षय (अनिमिया ),पोटदुखी,उलट्या,अतिसार,मळमळणे,
भूक मंदावणे, कुपोषण,थकवा व अस्वस्थता,शौचाच्या वेळेस रक्त पडणे,आतड्याला सुज येणे.हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी हा गोळयांचा डोस म्हत्वाचा आहे असे सांगितले.

तसेच जंताचा प्रादुर्भाव थोपविण्याचे मार्ग सांगताना
जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे, भाज्या व फळे खाण्यापुर्वी व्यवस्थित धुणे,स्वच्छ व उकळलेले पाणी प्यावे.
पायात चपला,बुट घालावेत
,नियमित नखे कापावित
,शौचालयाचा वापर करावा, उघड्यावर शौचाला बसु नये,परिसर स्वच्छ ठेवावा. असे सांगुन गावात मोहिम यशस्वी रित्या राबवली.
यावेळी नेहरू युवा केंद्राचे गोविंद ढाकणे, मिरा मुंडे, सुनिता केदार,जि.प.प्रा.शाळेच्या सिंधुताई मुंडे, खोगरे मॅडम, सरवदे मॅडम,गणेश वरवडे सर ईत्याची प्रमुख उपस्थिती होती. जंताचा नाश केल्याने बालकांना होणारे फायदे विषद करताना
रक्तक्षय (अनिमिया)कमी होतो,बालक क्रियाशिल होते व रोग प्रतिकारक शक्ती वाढते.शारिरीक व बौध्दिक वाढ सुधारते.आरोग्य चांगले राहते. जंतनाशक गोळी- एल्बेंडेझाॅल ४०० मि.ग्रॅम हि प्रत्येक बालकाला वय १ ते २ वर्ष अर्धीगोळी (२०० मि ग्रॅम)क्रश करून पाण्यात विरघळून पाजावी वय २ ते 3 वर्ष एक गोळी (४०० मि ग्रॅम) क्रश करून पाण्यात विरघळून व
वय 3 ते19 वर्ष एक गोळी(400मि ग्रॅम) चघळून खाऊ घालणे. आवश्यक आहे.असे श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या सचिव सौ.आशाताई ढाकणे यांनी प्रतिपादन केले.
राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्याठी गावातील दोन्ही अंगणवाडीताई व दोन्ही शाळेतील शिक्षक यांनी सहकार्य केले. याबद्दल नेहरु युवा केंद्राचे गोंविद ढाकणे यांनी आभार मानले.