वरुड तालुक्यासाठी दोन शासकीय वसतिगृहाची उभारणी होणार – आ.डॉ.अनिल बोंडे यांच्या प्रयत्नाने १५ कोटी ५६ लक्ष रुपयांच्या निधीला मंजुरात

0
805

श्री संदीप बाजड,
वरुड (अमरावती) :

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या तुलनेत आदिवासी विद्यार्थांना जागतिक दर्जाचे गुणवत्ता पुर्ण शिक्षण घेता यावे, मात्र दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थांना शहरात राहून शिक्षण घेणे शक्य होत नसल्याचे पाहून आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आदिवासी मंत्री विष्णूजी सावरा तसेच राज्यमंत्री अमरीशजी राजे यांच्याकडे वरुड तालुक्यासाठी आदिवासी मुला-मुलींच्या प्रत्येकी एक अशा दोन शासकीय वसतिगृहाची निवेदनाद्वारे मागणी केली. सदर मागणीला समर्थन देत मंत्री महोदयांनी आदिवासी मुला-मुलींच्या वेगवेगळ्या शासकीय वसतिगृह इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास ३० जुलै २०१८ रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. वरुड – मोर्शी मतदार संघाचे भाजपा आ.डॉ.अनिल बोंडे यांच्या प्रयत्नातून दोन्ही आदिवासी शासकीय वसतीगृहासाठी शासनाने १५ कोटी ५६ लक्ष ६० हजार ७५२ रुपयांचा निधी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी यांच्या माध्यमातून प्राप्त करून दिल्याने आता लवकरच उभारणी होणार आहे. विद्यार्थांसाठी शासकीय वसतिगृह उपलब्ध करून दिल्याबद्दल आनंद व्यक्त करीत आदिवासी विद्यार्थांच्या पालकांनी मंत्री तथा आमदार महोदयांचे आभार व्यक्त केले.

कधीकाळी आदिवासी समाज म्हणजे जंगलात राहणारा वस्त्रशून्य किंवा अर्धवस्त्र समाज असणारी ओळख आता आदिवासी समाजनेही पुसून मुख्य प्रवाहाची वाट धरली आहे. या समाजातून शिक्षित आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नैपूण्य दाखविणाऱ्यांचा टक्कादेखील वाढला आहे. वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात जाताना आपल्या गौरवशाली परंपरांचे जतन करणारा आदिवासी समाज अशी एक नवी ओळख निर्माण झालेली आपणास इथे दिसते. आदिवासींना ढाल करुन काही शक्तींनी मधल्या काळात या विकासात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र खऱ्या-खोट्याचा बोध झालेला आदिवासी आज खोडा घालणाऱ्यांना विकासात आडवे येवू नका असे छातीठोकपणे सांगत आहे. कारण आजपर्यंत आमच्या आदिवासी पुरुष – महिला तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध योजना सरकारने अमलात आणल्या परंतु आमच्या पर्यंत पोहचविण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळे कुठलेही योजना आदिवासींच्या घरापर्यंत पोहचल्याच नाहीत. आता मात्र पारदर्शक असलेल्या भाजप सरकारमध्ये प्रत्येक योजनांची माहिती आम्हा आदिवासींना मिळत असून त्याचा फायदा सुद्धा आम्हाला घेता येत आहे. विशेष म्हणजे मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी आमच्या उन्नतीचा विचार करीत आम्हाला योजनांची उचल करण्यासाठी पारदर्शक केले. आमच्या मुलामुलींच्या भविष्याचा विचार करून उच्च शिक्षणांसाठी राहण्याची सोय उपलब्ध केली, त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. कारण आजपर्यंत आदिवासींचा नुसता मतदानासाठी वापर करण्यात आला. मात्र आ.डॉ.अनिल बोंडे यांनी मतदानाचे फलित करून दिले अशा प्रतिक्रिया आदिवासी भागातून ऐकविण्यास मिळत आहे.