ठाणेदार गजानन शेळके यांच्या अकोटातील कार्यकाळास एक वर्ष पूर्ण

0
933
Google search engine
Google search engine

अकोट (संतोष विणके) – अकोट शहर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ ठाणेदार गजानन शेळके यांच्या आकोटातील प्रभावी कार्यकाळास आज रोजी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. वर्षभराच्या कार्यकाळात ठाणेदार शेळके यांनी चोख कायदा-सुव्यवस्था ठेवत सोशल पोलिसिंग द्वारा पोलिस व जनतेचे नाते दृढ करून शहरवासियांची मने जिंकली आहेत. विशेष म्हणजे ठाणेदार शेळके यांच्या वर्षभराच्या कार्यकाळात संवेदनशीलतेचा ठपका असणाऱ्या अकोट शहरातील अभूतपूर्व शांततेत यशस्वीपणे पार पडलेल्या धार्मिक स्थळांच्या निष्काषन मोहिमेचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल.

त्याशिवाय मोठ्या प्रमाणावर लाखो रुपयांचा गुटखा पकडत तरुणाईला व्यसनांच्या विळख्यात अडकू न देता गुटख्याची विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर टाकलेल्या धाडी,सोनू चौकातील वळण मार्गाचे केलेले कार्य ,यात्रा चौकातील भाजीबाजाराचे यशस्वी स्थलांतर, तेलंगणातील महेश त्रिगे तसेच शहरातील जहीर कोंड्या,यासारखे रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे ते कर्दनकाळ ठरले.कायदा व सुव्यवस्था चोख ठेवत एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे ठाणेदार शेळके यांनी या सोबतच सोशल पॉलिसींगच्या माध्यमातूनही जनतेच्या मनात पोलिसांविषयी सकारात्मक प्रतिमा निर्माण केली आहे.या दरम्यान त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेचा परिचय शहरवासीयांना अनेकदा आला आहे.

नैराश्यातील एका गरीब संकटग्रस्त ऑटोचालकाच्या दंडाची जवळपास दहा हजार रुपये रक्कम स्वतः भरत त्यांनी माणुसकीचा ओलावा जपला. तर 85 वर्षीय निराधार वृद्धेस साडीचोळी बहाल करून तिच्या उर्वरित आयुष्यासाठी वृद्धाश्रमात कायमस्वरूपी सोय केली.ही त्यांची कामगीरी अनेकांच्या ह्रुदयाला स्पर्श करून गेली.

तर जननी दोन मोहिमेत महिला तथा मुलींच्या सुरक्षा अधिकारांसाठी राबवलेली प्रभावी मोहीम यासह अनेक सामाजिक उपक्रमातून त्यांनी पोलिसांमध्ये असणाऱ्या माणुसकीच्या संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे.विशेष म्हणजे योग्य तपास करून तीन तरुणांचा गुन्हेगारी पार्श्वभूमी होण्यापासून वाचवत त्यांचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचवले.यासोबतच सीक्रेट सुपरस्टार म्हणून असणारे वर्दीतले कलाकार गायक ही त्यांची ओळखही अकोट करांना सुखावणारी वाटली. त्यांच्या कार्यकाळाच्या वर्षपूर्ती वर विदर्भ 24 न्यूज ने त्यांच्याशी संवाद साधला असता या वर्षपूर्तीनिमित्त त्यांनी अकोट शहरातील जनतेने दिलेले सहकार्य तथा प्रेम यामुळेच हे शक्य झाले असल्याचे बोलून दाखवले. यापुढे देखील शहरवासीयांच्या सहकार्य तथा प्रेमातून शहरात पोलीस कायदा व सुव्यवस्था चोख ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.