चांदूर रेल्वेतील युवकाच्या ‘द सीकर’ ला लघुचित्रपटाला आंतरराष्ट्रीय नामांकन – नोव्हेंबर २०१८ ला युरोपातील महोत्सवादरम्यान झेक रिपब्लिक या देशात होणार प्रदर्शित

0
922
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वेचे नाव पोहचले आंतरराष्ट्रीय स्तरावर

 

चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान)

 

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील गाडगेबाबा मार्केट परिसरात राहणाऱ्या हिमालयीन गिर्यारोहक अतुल वसंतराव खंडार या युवकाच्या ‘द सीकर’ या हिमालयातील प्रवासी लघुपटाला या वर्षी युरोप मध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या इंटरनेशनल फेस्टिवल ऑफ आउटडोर फिल्म्स (आयएफओएफ) मध्ये नामांकन मिळाले आहे.

 

हिमालय गिर्यारोहना बाबत जाग्रुती व्हावी, भारत, नेपाळ मधील  हिमालयाची ओळख जगाला व्हावी या उद्देशाने आंतरराष्ट्रीय कंपनी मध्ये मार्केटींग हेड असलेल्या ध्येय वेड्या अतुल खंडार यांनी २०१७  मध्ये ‘फर्स्ट पिलग्रिम ‘ या गिर्यारोहन संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून दरवर्षी अनेक ट्रेक चे आयोजन करण्यात येतात. तसेच अनेक शाळा महाविद्यालयामध्ये या बाबतच्या कार्यशाळा घेण्यात येतात. या वर्षी लोकशिक्षणाकरीता संस्थेने ‘द सीकर’ या लघुपटाची  निर्मिती केली. हा लघुपट एवरेस्ट च्या बेस कॅम्पच्या प्रवासावर आधारित असून विशेष बाब म्हणजे प्रवासा दरम्यानच या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. अतुल यांनी मे २०१७ मध्ये हा ट्रेक अवघ्या १२ दिवसात एकट्याने पुर्ण केला आहे. जिथे इतरांना १८-२०  दिवस लागतात.  हा ट्रेक  ५३८० मीटर उंचीचा असल्यामुळे जगातील कठीण ट्रेक मध्ये याची गणना होते. या प्रवासा दरम्यान अनेक कठीण प्रसंग आलेत तसेच प्रवासात  -१० ते -२० अंश तापमानाला सामोरे जावे लागले. सदर लघुपट फक्त गिर्यारोहना बद्दल बोलत नाही तर आयुष्याला संतुलित कसे कराल या बद्दल सुध्दा संदेश देतो असे अतुल यांनी सांगितले. सदर लघुपटाला नामांकन मिळाल्यामुळे येत्या ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१८ ला युरोपातील महोत्सवादरम्यान झेक रिपब्लिक या देशात प्रदर्शित केल्या जाणार आहे.  त्यामुळे जगाला हिमालयाची अधिक ओळख होईल. अतुल यांनी या पुर्वी असे अनेक  साहसपर ट्रेक पुर्ण केले आहेत, ज्या मध्ये विशेषत्वाने ५४२० मीटर उंचीच्या ‘चोला पास’ चा उल्लेख करावा लागेल.

 

या संपुर्ण यशामध्ये त्यांचे सहकारी नीरज मिश्रा यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. या यशाबद्दल समाजाच्या सर्व स्तरावरून कौतुक केल्या जात आहे. या क्षेत्रातील इच्छुकाकरीता सदर लघुपट संस्थेच्या यु ट्युब चॅनेल वर उपलब्ध असुन अधिक माहिती करीता संस्थेसोबत संपर्क करू शकता असे अतुलने म्हटले आहे.