अल्पसंख्याक वस्ती विकासासाठी आलेल्या निधीचा दुरुपयोग चौकशीची मागणी-सय्यद अलताफ

0
829

परळी(प्रतिनिधी)

नगर पालीकेला दरवर्षी राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाकडून शहरातील अल्पसंख्याक वस्ती विकासासाठी निधी येतो परळी नगरपालिकेने विकासासाठी आलेल्या निधीतून स्ट्रीट लाईट बसविल्याचे कागदपत्री दाखवीले पंरतु परळी शहरात स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम मुंबई येथील एनर्जी ईफिशीयंसी सर्वीसेस लिमिटेड मार्फत बसविण्यात आलेले आहेत त्याचा वारंटी काळ सात वर्षाचा आहे असे असताना नगर पालिकेने बोगस काम करण्याचे धाडस केले आहे या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मुख्यधिकारी यांच्या कडे ऑल इंडिया कौमी तंजीमचे जिल्हा अध्यक्ष सय्यद अलताफ यांनी निवेदनाद्वारे केली आहे
अल्पसंख्याक वस्ती विकासासाठी आलेल्या निधीतुन अल्पसंख्याक वस्तीत बालवाडी, आंगणवाडी,आरोग्य उपकेंद्र, वाचनालय नागरिकांचे हिताचे काम करण्याएवजी खोटे काम करण्याचा सपाटा लावलेला आहे या प्रकरणाची दखल नाही घेतल्यास आमरण उपोषण नगर पालिकेसमोर करण्यात येईल अशी माहिती सय्यद अलताफ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली.