आकोटला कॕन्सर रोग निदान,उपचार मार्गदर्शन शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
719
Google search engine
Google search engine

आकोट (संतोष विणके) –
कॕन्सर रोग होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे.कॕन्सर म्हणजे मृत्यू हा समज अत्याधूनिक तंत्रज्ञानाने चुकीचा ठरविला आहे.वैद्यकीय उपचाराने कॕन्सर रोग बरा होवू शकतो.त्यासाठी नियमित तपासणी व प्रतिबंधात्मक दक्षता घेणे महत्वाचे आहे.असा मोलाचा सल्ला प्रख्यात कॕन्सर सर्जन डाॕ .प्रसाद सोर यांनी दिला.

श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या सहकार्याने शिवसेना व ओझोन हाॕस्पीटल द्वारा सेनाप्रमुख मा.उद्धव ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त आयोजित कॕन्सर रोग निदान उपचार मार्गदर्शन शिबीराचे उद् घाट कार्यक्रमात डाॕ सोर बोलत होते.अध्यक्षस्थानी डाॕ, सचिनदादा लोखंडे होते.

याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जेष्ठ अधिव्याख्याता तथा स्तन कॕन्सर तज्ञडाॕ कल्पना काळे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख दिलिप बोचे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख देवश्री ठाकरे, उपप्रमुख माया म्हैसणे,तथा शिबीराचे मुख्य संयोजक डाॕ विनित हिंगणकर .संत वासुदेव महाराज ज्ञानपीठाचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर विश्वस्त दिलिपराव हरणे,कमलताई गावंडे आदी हजर होते.

दरम्यान माजी आमदार संजय गावंडे,
तथा .संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. वासुदेवराव महाराज महल्ले ,शिवसेना जिल्हा प्रमुख नितिन देशमुख,राजु राव संपर्क प्रमुख भास्कर ठाकुर ,अक्षय घायल,युवासेना उपप्रमुख राहुल कराळे यांनी शिबीराला भेट देवून शिबीरार्थी रुग्णांशी आस्थेने संवाद साधला..

कार्यक्रमाचे संचालन राममुर्ती वालसिंगे यांनी तर आभार प्रदर्शन माया म्हैसणे यांनी केले.

या शिबीरात १८७ रुग्णांची प्राथमिक तपासणी करुन निदान उपचार व शस्त्रक्रिया बाबत मार्गदर्शन करण्यात आले .रुग्णांची तपासणी व विविध चाचण्या घेण्यात आल्यात.त्यामध्ये आढळलेल्या ११ कॕन्सर रोगी रुग्णांचा पुढील मोफत उपचारासाठी ओझोन मल्टीस्पेशालिटी हाॕस्पीटलला संदर्भीत उपचारासाठी पाचारण करण्यात आले.

व-हाडला कॕन्सर मुक्त करण्याचा निर्धार डाॕ विनित हिंगणकर
कॕन्सर रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. योग्य निदाना अभावी व उपचारातील अज्ञान,संकोच व मार्गदर्शन अभावी अनेकांचा मृत्यू होतो. कॕन्सर रोगाविषयी जनजागरणाची व वैद्यकीय मार्गदर्शनाची गरज लक्षात घेवून आकोट विधान सभा मतदार संघातून कॕन्सर मुक्ती अभियानाला प्रारंभ केला आहे.या अभियानांतर्गत जनजागृतीसह कर्करोग तपासणीची अत्याधुनिक सुविधा ओझोन हाॕस्पीटल मध्ये उपलब्ध करण्यात आलीआहे.आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी उपचार करण्यात येत आहेत. व-हाड कॕन्सर मुक्त करण्याचा संकल्प शिवसेनेच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा प्रमुख तथा ओझोन हाॕस्पीटलचे संचालक डाॕ विनित हिंगणकर यांनी यावेळी व्यक्त केला*
*ओझोन हाॕस्पीटल द्वारा जनहितार्थ राबविण्यात येणा-या विविध सेवा उपक्रमाची त्यांनी माहीती दिली.*
——————————-

डाॕ कल्पना काळे यांनी समुपदेशनाद्वारे स्तन कॕन्सर निदान,लक्षणे व उपचाराबाबत मार्गदर्शन केले.
या शिबीरात डाॕ. आशिष गी-हे,डाॕ.दिक्षा कांबळे,डाॕ विद्या डोले,डाॕ.पुजा तळोकार,डाॕ.अश्विनी पेटकर,डाॕ.ऐश्वर्या मंत्री,डाॕ.श्ररयू भोरे,नाना पाटील,शुभम चौधरी,नागेश मेहरे,योगिता सुर्यवंशी,सरिता काळे,मंगला धांडे,तुकाराम आखतकर,सतिश सिरसाट यांनी वैद्यकीय सेवा दिली.

शिबीराचे यशस्वीतेसाठी मधुकरराव पुंडकर,सुधाकरराव हिंगणकर , बंडू कुलट,गजानन महल्ले, शिवसेना शहर प्रमुख सुनिल रंधे,विक्रम जायले,शाम गावंडे,महिला प्रमुख उषाताई गिरनाळे,सर्कल प्रमुख जयाताई देशमुख , दिलिप कुलट ,महादेवराव बोरोकार यांनी परिश्रम घेतले.
श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या कर्मचारी व सेवेक-यांचे विशेष सहकार्य लाभले.