आदिवासींच्या आनंद सुखासाठी ४५ दिवस श्रमदान करणारा योद्धा जलदूत

0
1557
Google search engine
Google search engine

अकोट (संतोष विणके)- वॉटर कप स्पर्धा 2018 मध्ये अकोट तालुक्यातील अनेक गावांनी सहभाग घेतला होता गतवर्षी जितापुर या गावाने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावरही पुरस्कार मिळवण्यासाठी धडक मारली होती त्या पार्श्व भूमी ने दुसऱ्या वर्षी तालुक्यात चळवळीसाठी श्रमदान करताना अक्षरशः तुफान आले होते.मात्र या तुफानातही काही दिवे हे अलिप्त, दुर्लक्षित ,अन बेदखल ठरले.पाणी चळवळीसाठी संपूर्ण स्पर्धेदरम्यान श्रमदान करत गेल्या दोन वर्षांपासून डांगर खेडच्या पाणीदार शिवारासाठी झटणारे उपेक्षित जलदूत म्हणजे संदीप बोबडे.पाणी अडवायचे या ध्यासाने काम करणारा ध्येयवेडा शिक्षक जलदूत संदीप बोबडे यांनी दुर्गम डांगरखेडला पाणीदार बनवण्यासाठी श्रमदान तर केलेच पण स्पर्धेसाठी लागणारे श्रमदान लोकसहभाग यासाठी देखील आपले योगदान दिले.कोणाचही लक्ष नसणाऱ्या डांगर खेडला दोन वर्षापासून श्रमदानाचा मळा फुलवत त्यांनी चळवळ उभी केली. त्यांच्या प्रयत्नाने डांगर खेडच्या आदिवासी बांधवांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्ष अधिकारी-कर्मचारी यांनी डांगर खेडला श्रमदान केले दुर्दैवाने अतिशय गरीब असणारे आदिवासी बांधव लोकवर्गणीतून करावयाच्या कामात कदाचित मागे राहिल्यामुळे स्पर्धेत त्यांना अपेक्षित क्रमांक मिळवता आला नाही मात्र झुळझुळणारं पाणी हेच आमचा मोठा पुरस्कार असल्याचं तिथल्या कामांवरुन वाटतं आणि हे पाणी अडवण्यासाठी दररोज वीस किलोमीटरच्या वर प्रवास करून श्रमदान करणाऱ्या उपेक्षित बेदखल जलदुत संदीप बोबडे यांच्या श्रमांचे सोने करणारे ठरले असेच म्हणावे लागेल.