अकोट शहर पोलिसांचा अवैध गुटख्या विक्री करणाऱ्यांना आणखी एक धक्का – दहा हजारांचा गुटखा जप्त

0
772

अकोट (संतोष विणके)– आकोट शहर पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा जप्त केल्या नंतर अवैध गुटख्या विरुद्ध कारवाई सुरूच ठेवली असून आज दिनांक 12।8।18 रोजी परत 10,000 रुपये किमतीचा गुटखा व 12,000 रुपये किमतीची मोटर सायकल असा एकूण 22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे. पोलिस सूत्रा कडून प्राप्त माहिती नुसार अकोट शहर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील सपोनि डी एन फड संजय घायल, गोपाल अघडते, राकेश राठी, सुल्तान पठाण विजय सोळंके ह्यांना मिळालेल्या माहिती वरून त्यांनी पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली कृषी विद्यालय जवळ दबा धरून बसले असता ,मिळालेल्या माहिती प्रमाणे शे मेहबूब अब्दुल लियाकत रा घसेंटिपूरा हा त्याची बजाज M 80 क्र MH 30 Q 8572 ने महाराष्ट्र सरकार ने प्रतिबंधित केलेला गुटखा व पान मसाला वाहून नेत असतांना मिळून आल्याने त्याची चौकशी केली असता मोटर सायकल ला बांधलेल्या मोठ्या बोरी मधून गुटखा व पानं मसाला मिळून आल्याने 10,000 रुपये किमतीचा गुटखा व पान मसाला व 12,000 रुपये किमतीची मोटर सायकल असा एकूण 22,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, सदर ची कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ,पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन अकोट शहर च्या गुन्हे शोध पथकाने केली, अकोट शहर पोलिसांच्या धाड सत्र मुळे गुटखा माफिया धास्तावले आहेत.तर आता पर्यत लाखो रुपायांचा गुटखा पोलीसांनी पकडल्या नंतरही अन्न औषध प्रशासन विभागाने माञ बघ्याची भुमीका घेतली आहे काय असा सवाल जनतेला पडतो आहे.