पावसाची श्रावणत हजेरी नाही.नदी कोरड्याच

0
1232
Google search engine
Google search engine

👉🏻-श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनि ऊन पडे… उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रावण त पावसाची उपस्थित नाही.

👉🏻विदर्भातील छोटी काशी म्हणून प्रसिद्धी प्राप्त देवाचा वाडा देऊरवाडा येथील पूर्णा नदी कोरडीच


वैभव उमक :-शी.बंड

 

चांदुर बाजार तालुक्यातील देवाचा वाडा म्हणून प्रसिध्द असलेले देऊरवाडा काजळी हे गाव पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे.या गावाला विदर्भातील छोटी काशी म्हणून अशी प्रसिद्धी मिळाली असून या ठिकाणी अनेक देवदेवतांवास,साधू संत यांचे महात्मे आहे.या याच गावामध्ये त्रिवेणी नद्यांचा संगम असल्याने दर्शनासाठी येणारे भावीक या संगमात स्नान करत असतात.मात्र पावसाने यावर्षी दांडी मारल्याने या ठिकाणी पूर्णा आणि मेघा नदीला पाणीच नसल्याने भाविकांची स्नान करण्याची इच्छा अपूर्ण राहणार आहे.तर या ठिकाणी साडे अकरा ज्योतिर्लिंग हे त्रिवेणी च्या संगमाच्या ठिकाणी आहे.गुलाबराव महाराज यांनी या ठिकाणची विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या आवारात कात्यायनी व्रत केली असल्याची आख्यायिका आहे.तसेच महानुभाव पंथाचे अनेक मंदिर या ठिकाणी आहे.त्यामुळे या गावाला विशेष दर्जा प्राप्त झाला आहे.मात्र नद्या कोरडी असल्याने या ठिकाणी भाविकांची गर्दी ओसारणार असल्याचे दिसत आहे.


दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी पाहायला मिळते.देऊरवाडा या गावांमध्ये नृसिंह महाराज यांचे,सोमतिर्थ असे अनेक मंदिर आहे.श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात शंकर जी देवता यांची पूजन केले जात असतात.तर महिला वर्ग कडून या महिन्या उपवास देखील ठेवले जातात.

श्रावण मास म्हणजे सुहासिनींच्या व्रतवैकल्याचा महिना. श्रावणापासूनच चातुर्मासाला सुरवात होते, विविध सणवारांनाही प्रारंभ होतो. या महिन्यात श्री शंकराची आराधना करण्याची प्रथा आहे. पान-फूल,बेलपत्र आणि दुधाचा नैवेद्य घेऊन अनेक महिला शंकराचे पूजन करतात. आज श्रावणातील पहिला सोमवार असल्याने चांदुर बाजार तालुक्यातील देऊरवाडा काजळी गावामध्ये विविध महादेव मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र असणार आहे.तर पावसामुळं भाविकांचा आनंद द्विगुणित करणाऱ्या पूर्णा आणि मेघा नदी या पावसामुळे कोरड्याच आहे.