वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची अलौट गर्दी हर हर महादेव, वैद्यनाथ महाराज की जय, जय भोलेनाथाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला

160

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-

बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन भाविकांनी घेतले. भाविकांनी मंदिर परिसरात हर हर महादेव शंभू महाराज की जय असा शिवनामाचा जयघोष करीत देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या हजारो भाविकांना श्रावणातील सोमवार असल्याने भाविकांची गर्दी मोठी होती. मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच यावर्षी पावसाचे प्रमाणे कमी असल्याचे हे भोलेनाथा पाऊस कधी पडणार अशी विनवनी शेतकरी भाविक करीत आहेत.

पहिल्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापेैकी एक असलेल्या येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली. दुपारी १ पर्यंत जवळपास एक लाख भाविकांनी वैदनाथाचे दर्शन घेतले आहे. ‘हर हर महादेव’ चा जयघोष करीत भाविकांची रविवारी रात्रीपासूनच वैद्यनाथ मंदिर परिसरात रीघ लागली होती.

दर्शन सुलभ व्हावे यासाठी संस्थानाने विविध सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. मंदिराच्या उत्तर पायऱ्यावर लोखंडी बॅरीकेटिंग लावून महिलांसाठी वेगळ्या रांगांची खास सोय करण्यात आली आहे. सकाळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार आर.टी. देशमुख यांनी तर दुपारी विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले.

यासोबतच येथे वैद्यनाथ मंदिर ट्रस्ट, लिंगायत समाज व भाविकांच्यावतीने राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा श्रावणमास तपोनुष्ठान सोहळासुद्धा सुरु आहे. यासाठीही भाविकांचे मोठ्या प्रमाणावर शहरात आगमन होत आहे. अनुष्ठानाच्या पहिल्याच दिवशी श्रावण महिना सुरु होत असल्याने भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.

मंदिर परिसरात २०० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे. अंबाजोगाईचे अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी बंदोबस्ताची पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश गायकवाड यांच्यासह पोलीस निरीक्षक डि.के.शेळके,उमाशंकर कस्तुरे व देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांची उपस्थिती होती

बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गजुरात आदी भागांतून भाविक दाखल झाले आहेत. गंगेचे पाणी कावडीने पायी परळीला आणून वैद्यनाथाला अभिषेक करण्यासाठी आलेल्या भाविकांना दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, भाविकांना दर्शनासाठी अडचण होऊ नये म्हणून वैद्यनाथ देवस्थानच्या वतीने सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या पाश्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

तालुक्यातील महादेवाचे मंदिरात शिवभक्तांची आलोट दर्शनासाठी रांगाच रांग

श्रावण महिन्यातील सोमवारी सर्वत्र शिवालय भक्तांनी गजबजून गेले होते. तालुक्यातील मालेवाडीचे अंधारेश्‍वर, जिरेवाडीचे सोमेश्‍वर, तपोवनचे रामेश्‍वर, सोनहिवरा महादेव मंदिरात, टोकवाडीचे रत्नेश्‍वर, धर्मापुरीचे मल्लिकार्जुन, कासारवाडीचे केदारेश्‍वर, अशी ग्रामीण भागातील शिवालयांमध्येही भक्तांनी दिवसभर गर्दी केल्याचे दिसत होते. परळी शहरातील संत जगमित्र, गुरूलिंग स्वामी मंदिर, सुर्वेश्‍वर मंदिरासह शहराच्या विविध महादेव मंदिरांत भक्तांची गर्दी झाल्याचे पाहावयास मिळत होते.

मंदिर परिसरात बेल-फुलांच्या दुकानावर भाविकांची गर्दी

महादेवाला बेल अधिक आवडत असल्याने आज बेल-फुलांना प्रचंड मागणी होती. वैद्यनाथ मंदिराकडे जाणार्‍या प्रत्येक रस्त्यावर बेलाची पाने घेऊन विकण्यासाठी महिला, मुले, मुली आणि पुरुषही थांबले होते. केवळ बेल-फुलांवर लाखोंची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।