सुट्टी काढुन आदीवासी बांधवांसह ४५ दिवस मुक्कामी राहुन श्रमदान करणारा भगीरथी जलदुत

0
2423
Google search engine
Google search engine

आकोलाः (संतोष विणके) – वॉटर कप स्पर्धेत जिल्यातील अकोला तालुक्याचा समावेश नव्हता त्यामुळं श्रमदानाचे तूफानात अकोला तालुक्याचा ग्रामीण भाग सुटला. मात्र अकोला तालुक्यातील आपातापा येथील डॉ नंदकिशोर चिपडे या तरुण मित्राला याची खंत वाटलीअन त्याने ठरवले की माझ्या गावात जलचळवळ नाही म्हणून काय हातावर हाथ देऊन बसायचे .तो उठला अन थेट सातपुड्याच्या पायथ्याशी आदीवासी बांधवांच्या सोबतीने जलसंधारण साठी 45 दिवस श्रमदान केले. आज त्याच्या श्रमदानाचे चिज झाले.अन डोंगराळ शिवार जल बांध पाण्याने भरत आहेत.डॉक्टर चिपडे है पशुवैद्यक आहेत. शेतकर्याचा जनावरांचा इलाज करत असल्या मुळे शेती पानी ,जनावरांचा पाण्या वाचून होणाऱ्या परवडीची त्यांना माहिती आहे .त्यामुळेच त्यांनी ठरवले की उन्हा तान्हाची परवाह न करता श्रमदान करायच विशेष म्हणजे सातवां वेतन आयोग साठी झगडणारा नोकरदार हे नेहमी साध्या कामांसाठी पन सुटी मिळत नाही काय करावे असे सांगतात.माञ चिपडे यांनी नोकरीतुन सुटी काढुन श्रमदानासाठी आदिवासींच्या सोबतने मुकामी थांबणारा अवलिया जलदूत म्हणजे डॉक्टर चिपडे त्यामुळे ते खरेखुरे भागीरथी जलदुत आहेतपाण्याच्या बचतीसाठी त्यांनी जागर फाउंडेशन द्वारा अकोला शहर जल बचत कार्यशाला घैतली. रूफ वाटर हारवेस्टिंग बाबत जनजागृति केली .आदिवासी बहुल चंदनपुर जिला परिषद शाळेतील शिक्षक मित्र तुलसीदास शिरोडकर यांच्या वाढदिवसाला सुमारे 27 हजाराचे कुदळ फावडे टोपली हे श्रमदानासाठी लोकवर्गणीतुन भेट दिलेत. अश्या या दांडगी सामाजिक उपेक्षित जाणीव असणाऱ्या बेदखल जलदुताला पाणीदार सलाम.