के.सी.ई. मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

0
988
Google search engine
Google search engine

जळगाव / विशेष प्रतिनिधी-
के.सी.ई. सोसायटी च्या गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय , ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय , ओरिअन स्टेट बोर्ड , ओरिअन सी.बी.एस.ई. व किलबिल बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने 72 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाच्या मुख्य.सौ.रेखा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.छोडो कल की बाते , आओ बच्चो तुम्हे दिखाये , जननी जन्मभूमी जयोस्तुते , इत्यादी देशभक्तीपर गीते सादर करून विद्यार्थ्यांनी वातावरण प्रफुल्लित केले.दामोदर चौधरी , जिगर चौधरी , पूर्वा चौधरी ,प्रियंका वंजारी , कृष्णगिरी गोसावी यांनी सुंदर अशी भाषणे व कविता सादर केल्या. त्यांनतर तंबाखूमुक्ती ची प्रतिज्ञा घेण्यात आली.

प्रसंगी के.सी.ई. सोसायटी चे शिक्षण समन्वयक के.जी.फेगडे , चंद्रकांत भंडारी , ए.टी. झांबरे विद्यालयाचे मुख्या.डी. व्ही.चौधरी , ओरिअन स्टेट बोर्ड चे मुख्या.संदीप साठे , ओरिअन सी.बी.एस.ई. च्या मुख्या.सुषमा कंची , किलबिल बालक मंदिराच्या मुख्या.सौ.मंजुषा चौधरी.इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी , योगेश भालेराव ,सतिष भोळे , प्रणिता झांबरे , योगेश सुने , युवराज वांगेकर आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.