नॅशनल मिलिटरी स्कूल गायगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -लष्करी शिस्तीत राष्ट्रवंदना

0
2440

अकोला (संतोष विणके)-डाबाकी मार्गावरील गायगावातील महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ रूलर डेव्हलपमेंट अकोला द्वारा संचालित नॅशनल मिलिटरी स्कूल अँड जुनिअर कॉलेज ऑफ सायंस अकोला (गायगांव) येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे व्यवस्थापकीय संचालक श्री महेश गणगणे हे होते तर प्रमुख अतिथि म्हणून लेफ्टनंट सुनिल डोबाळे,(पुणे), भास्करराव सावरकर हे होते. यावेळी मंचावर शाळेच्या प्राचार्या संगीता बघेले (सिसोदिया), पर्यवेक्षक विजय हाडोळे, पीआरओ किशोर पवार, जेसीओ साहेबराव काळे,भुमि फाऊंडेशन विदर्भचे संतोष विणके आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध परेड संचलन केले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व कवायती सादर केल्या. यानंतर मान्यवरांची नियोजित भाषणे झाली.प्रास्ताविक मनोगत शाळेच्या प्राचार्य बघेले मॕडम यांनी व्यक्त केले.त्याआधी अकोट तालुक्याचे भुमिपुञ सुनिल डोबाळे हे लष्कराच्या सेवेत लेफ्टनंट सारख्या उच्च पदावर सेवा देत आहेत यानिमित्य संस्थेच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना लेफ्टनंट सुनिल डोबाळे सर यांनी लष्करी क्षेत्रातील शिस्त त्याग व भविष्याच्या संधी आदींबाबत मार्गदर्शन केले.पुढे बोलतांना ते म्हणाले लष्करी सेवेमुळे आज मी दक्षिण अफ्रीका,श्रीलंका ,ईजिप्त यासह अनेक देशात भारताचे प्रतिनिधीत्व करत सेवा दिली.विदर्भात नॕशनल मिल्ट्रि स्कुल सारखी चांगली शाळा असणे गौरवास्पद आहे.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश गणगणे यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईल सारख्या प्रलोभनांपासुन दुर रहावे असे आवाहन केले.तसेच त्यांनी नॕशनल मिल्ट्रि स्कुल ही राष्ट्र सेवेत जाण्यासाठी शिक्षण देतांना कुठेही कमी पडणार नाही.असे वचन दिले े.यावेळी त्यांनी शिक्षक पालक विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य पर्वाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी मान्यवरांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारीतोषिकं तथा प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी , पालक व गावकरी हजर होते. असे सुमेघ वानरे यांनी कळवीले आहे.