छोट्या वृत्तपत्रांवरची जाहिरातबंदीची कुऱ्हाड ही लोकशाहीचा कपाळमोक्ष करणारी आहे

112

बीड:परळी वैजनाथ, नितीन ढाकणे

छोट्या वृत्तपत्रांवरची जाहिरातबंदीची कुऱ्हाड ही लोकशाहीचा कपाळमोक्ष करणारी आहे. सरकारने छोट्या वृत्तपत्र मालक-संपादकांच्या मागण्या मान्य कराव्यात,  संपूर्ण विरोधी पक्ष छोट्या वृत्तपत्रांच्या आणि पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. – धनंजय मुंडे

राज्याचं प्रस्तावित जाहिरात धोरण छोट्या वृत्तपत्रांना मोडीत काढणारं, बड्या वृत्तपत्रांना दावणीला बांधणारं आहे. राज्यातल्या हजारो छोट्या वृत्तपत्रांच्या मालक-संपादकांच्या मनातील भीती खरी ठरली तर या देशातली लोकशाही मोडीत निघेल.