हमारी जान हमारी शान संविधान

0
760
Google search engine
Google search engine

 

सिरसाळ्यात संविधान सन्मान मार्चला शेकडोंची उपस्थिती.

बीड :सिरसाळा ,नितीन ढाकणे

भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक राहातात तेही अतिशय अनंदाने परंतु हा आनंद काही विक्षिप्त विचारांच्या लोकांना पहावत नाही. अशांनी दिल्ली येथे भारतीय संविधानाची प्रत जाळून समाजातील सलोखा बिघडवण्याचे काम केले परंतु या विचारांना यश आले नाही. संवैधानीक विचारांच्या अनेक नागरीकांना जात धर्म पंथ राजकीय पक्ष संघटना यांचे जोडे बाजुला ठेवुन संविधान सन्मानार्थ रस्त्यावर उतरून संविधानाचा सन्मान केला.
सिरसाळा येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्यावर परिसरातील शेकडो तरुण एकञ येवुन अतीशय शांततेत सिरसाळा बसस्थानक येथुन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक इथपर्यंत शांत रॅली काढली रॅलीत संविधान तसेच संविधान प्रस्तावित प्रत घेऊन लहानापासुन वयव्रध्दापर्यंत शेकडो लोक उपस्थित होते. रॅलीत उतरलेला तरुण वैचारीक क्रांती अपेक्षित कारणास्तव मुख्य चौकात रॅलीत येताच सर्व रस्ता बाजुला सोडुन वाहतुक व पोलिस कर्मचार्‍यांना अडथळा होणारे नाही या हेतुने रस्त्याच्या कडेला थांबुन शिस्तीत उपस्थितीतांना संविधानाचे महत्त्व पटवून दिले व संविधान प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करुन राष्ट्रगीताने संविधान सन्मान मार्चची सांगता तुम्हा आम्ही भारतीय या विचारां खालील सर्व जाती धर्माचे तरुणांनी मी भारतीय म्हणून योग्य शिस्तबद्ध नियोजनात सांगता केली.