सावरा बॕक शाखेत ATM युनिटचे चे उद् घाटन नानासाहेब हिंगणकर यांचे हस्ते संपन्न

0
1249
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणकेजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॕकेच्या ग्राहक,ठेवीदार व कर्जदारांना अधिकाधिक अत्याधुनिक सुविधा देण्याचा जाणिव पूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे एटीएम सह मोबाईल बॕकींग द्वारा बॕकेचे व्यवहार करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बॕकेचे जेष्ठ संचालक नानासाहेब हिंगणकर यांनी केले आहे.जिल्हा बॕकेचे सावरा शाखेतील ए टी एम युनिटचे उद् घाटन प्रसंगी नानासाहेब हिंगणकर बोलत होते.अध्यक्षस्थानी अशोकराव पायघन होतेअकोला जिल्हा बॕकेच्या मोबाईल बॕकींग सेवेचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे .त्यामूळे ग्राहकांना तत्परतेने घरबसल्या या सेवेचा लाभ होईल असे सांगून नानासाहेबांनी बॕकेच्या मोबाईल अॕपची तांत्रिक माहीती दिली.कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शंकरराव चौधरी,डाॕ गजानन महाले,सावराचे सरपंच प्रकाश जवंजाळ,मंचनपूरचे सरपंच शैलेश धांडे,सहकारी सोसायटीचे अध्यक्ष विनायकराव सपकाळ,बाबुराव सपकाळ, मधुकरराव सपकाळ,संतोष सपकाळ, पत्रकार विठ्ठलराव गुजरकर,बाळा साहेब भांबुरकर,विजय जवंजाळ,गजानन चौधरी,अशोकराव पाचडे,शफाकतआली,बॕकेचे वरिष्ठ निरिक्षक श्रीकृष्ण वालसिंगे,शाखाधिकारी सौ तरोडे,गटसचिव प्रभूदास मेंढे,उपस्थित होते.

कौठ्याचे माजी सरपंच नंदकिशोर भांबुरकर व खंडेराव गुरुजींनी सर्वप्रथम या द्वारे व्यवहार करुन नविन ATM युनिटचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन गजानन चतरकर यांनी आभार प्रदर्शन गजानन महाले यांनी केले.कार्यक्रमाला बॕकेचे ग्राहक व शेतकरी उपस्थित होते.