सिरसाळा येथे क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

0
725
Google search engine
Google search engine

पराभावाला खचून न जाता खेळाडूंनी खेळाडूंवृत्ती जोपासवी-प्रा.टी. पी.मुंडे

बीड:
नितीन ढाकणे, दिपक गित्ते

जीवनामध्ये खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे .ताणतणावा पासून सुटका मिळण्यासाठी खेळ खेळणे महत्त्वाचे आहे म्हणून खेळाडूंनी पराभावाला खचून न जाता खेळाडूंवृत्ती जोपासावी असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारणी सदस्य तथा प्रदेश सरचिटणीस प्रा.टी. पी.मुंडे(सर)यांनी केले
सिरसाळा येथे महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट संघटनेने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारणी सदस्य तथा प्रदेश सरचिटणीस प्रा.टी. पी. मुंडे(सर) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागापूर जि. प.सदस्य प्रदीपभैया मुंडे,युवक काँग्रेसचे परळी अल्पसंख्याक शहराध्यक्ष बबलू सय्यद साजेद, गफारभाई बागवान,शेख इरफान भाई , शेख जायद,माजी सरपंच पांडुरंग सलगर,युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राहुल काकडे, अनिल पांचाळ सर, सेवा सोसायटी सदस्य किसन राठोड, सिरसाळा ग्रा.प.सदस्य दौलतभाई,प्रा.संदीपा न मुं डे, बाबासाहेब डापकार आदी उपस्थित होते
पुढे बोलताना प्रा.टी. पी.मुंडे(सर)म्हणाले की,खेळामुळे जिवनात शिस्त येते.खेळामुळे जीवनात आरोग्य, आनंद, प्रसिद्धी मिळते.खेळामुळे खेळाडूंमध्ये सांघिक भावना निर्माण होते. सर्व जातिभेद विसरून सर्व खेळाडू खेळ खेळत आसतात यामुळेच राष्ट्रीय एकात्मतेचे जोपासली जाते.क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण चोवीस संघ सहभागी झाले होते त्यापैकी पोलीस मित्र क्रिकेट क्लबने प्रथम पारितोषिक तर आयर्न क्रिकेट क्लबने दुसरे पारितोषिक पटकावले दोन्ही संघाना पारितोषिक अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारणी सदस्य तथा प्रदेश सरचिटणीस प्रा.टी. पी. मुंडे(सर) यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. प्रा.टी. पी.मुंडे(सर)यांनी दोन्ही संघाचे अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या