श्रीचे स्वागत श्रीच्या दारी

0
830
Google search engine
Google search engine

श्रीसंत गजानन महाराज
पंढरपूरच्या विठूरायाची गळाभेट
घेऊन श्रींच्या पालखीचे परतीच्या
प्रवासाला सुरुवात केली असून,
पालखीचे विदर्भाच्या पंढरीत आगमन झाले आहे. श्रीचा
देखणा पालखी सोहळा १७ ऑगस्ट
रोजी संतनगरीत स्वगृही परत आला
आहे. आषाढी एकादशी निमित्त ५१
व्या श्रींच्या पालखी सोहळ्याचे १९
जून रोजी शेगाववरून प्रस्थान झाले
होते दोन महिन्याच्या प्रवासानंतर
श्रींचा पालखी सोहळा शेगावी आल्या
असल्याने गावकर्यांचा आनंद शिगेला
पोहचला असून, पालखीच्या
आगमनाची जय्यत तयारी सुद्धा केली होती.
१७ ऑगस्टला श्रींच्या पालखीचे
पहिले आगमन ११ वा. दरम्यान
श्रीसंत गजानन महाराज अभियांत्रिकी
महाविद्यालयात झाले. त्याठिकाणी
आपत्याच दारी आपले स्वागत मोठ्या आनंदोत्सवात साजरा करण्यात
आला. तेथून पालखी गजानन वाटीका
येथे पोहचले. त्यावेळेसचा तो क्षण
पाहण्यासारखा राहीलया ठिकाणी
गळाभेट होताना दिसतेएकीकडे
पंढरपूरवरुन आलेली पालखी व
दुसरीकडून मंदिरामधून त्यांना
आणण्याकरिता काही अंतर चालून
जाऊन त्या पालखीची गळाफेट
घेऊन त्यांना वाटिकेत घेऊन येतात
त्यानंतर तेथे भाविक भक्तांना दर्शनाकरिता व महाप्रसादाकरिता
काही काळ विश्रांती असते. दुपारी २
वा. दरम्यान श्रींचा पालखी सोहळा
मंदिराच्या दिशेने गावातून मार्गक्रमण
होत असतो.
ज्या मागनि पालखी जात असते
तो मार्ग रांगोळ्या व फुलांनी
सजविलेला असतो. पालखीचे
ठिकठिकाणी स्वागत होते. श्रींची
पालखी सायंकाळी ६ वा. दरम्यान
मंदिरात पोहवत असते व तेथे डोळ्याचे पारणे फेडणारा रिंगण
सोहळा होत होतो. दोन महिने वारीत
पायी चालून आलेले वारकरी “गण गण गणात बोते”
नामात तल्लीन होत
रिंगण सोहळा खेळतात. त्यानंतर
महाआरती होऊन वारीच्या पालखीची
समाप्ती होते.
अशा प्रकारे पालखीच्या
आगमनाचा सोहळा येत्या शुक्रवार
आज १७ ऑगस्ट रोजी भाविक भक्तांना
पहावयास मिळाला आहे.