कड़ेगाव किरण मेडिकल शॉपी येथे मोफत साखर तपासणी

0
781
Google search engine
Google search engine
सांगली-:हेमंत व्यास.
सांगली जिल्ह्यातील कड़ेगाव येथे सामाजिक कार्यात झोकून दिलेले किरण मेडिकल शाॅपीचे मालक अभिमन्यु वरूडे यांनी मधुमेह (शुगर)व रक्तदाब (ब्लड प्रेशर) तपासणी  सर्वाना, व  डायबेटिज रुग्ण याना  साखरेचे शरीरातील  योग्य प्रमाण चेक करण्यास किरण मेडिकल शॉपी कड़ेगाव m+m येथे मोफत सुविधा दर सोमवारी सुरु आहे, असंख्य लोक त्याच्या लाभ घेत आहेत. मधुमेह आपल्या देशाची वाढती समस्या आहे.या जगात मधुमेहींच्या   गणनेमध्ये आपला दुसरा नंबर येतो
.प्रत्येक पाचव्या भारतीय नागरिकांना मधुमेह असुन ही अतिशय गंभीर व काळजीची बाब आहे.सर्वसाधारण प्रमाणापेक्षा जास्त साखर रक्तात असताना जर ती वेळेत कळली तर त्यावर त्वरीत उपचार पथ्य केले तर तर ती आटोक्यात आणता येते.तेही मोफत. लोकांचा  70 ते 100 रुपये साखर चेक करण्यास लेब्रोटरी येथे येणारा ख़र्च हा वाचत आहे .फार्मासिस्ट साखर उपाशिपोटी
                   (जेवणापूर्वी) व जेवणा नंतर दोन तासांनी चेक करुन साखरेचे प्रमाण किती असावे ते पेशंट ला  मार्गदर्शनकिरण मेडीकलचे मालक अभिमन्यु वरूडे करीत असतात.तसेच किरण मेडिकल शॉपी येथे मोफत रोज ब्लड प्रेशर तपासणी सुविधा आहे.कारण आजच्या धकाधकीच्या स्पर्धात्मक यांत्रिक युगात तणावाचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे तरूण पिढीमध्ये ब्लड प्रेशरचे प्रमाण जास्त होत चालले आहे असे वाटले की  डॉक्टरांना दाखवुन यावे असा सल्ला दिला जातो.तसेच आदर्श वजन मापनचार्ट वयानुसार वजन किती असावे असा वजन काटा उपलब्ध आहे.तसेच २४ तास सर्वांना शुध्द पाणी पिण्यासाठी पाणी फिल्टर वाॅटर कुलर उपलब्ध केला आहे.तरी गरजू लोकांनी लाभ घ्यावा असे किरण मेडिकल शॉपी चे मालक अभिमन्यु वरूडे यांनी असे आवाहन केले आले आहे.त्याच बरोबर सामाजिक उपक्रम कडेगांव येथे किरण मेडीकल चे अभिमन्यु वरूडे राबवित असतात.यासर्व सुविधा दर सोमवारी मेडीकल शॉपी मध्ये उपलब्ध आहेत.समाज कार्याची बांधीलकी जोपासण्याचे काम अविरत चालू असते.