आज चांदूर रेल्वेत भव्य रक्तदान शिबीर – अ.भा.ग्रा. पत्रकार संघ व मुंधडा महाविद्यालयाचे आयोजन

0
828
शिबीरासाठी अमरावती जिल्हा सामान्य रूग्णालयाची चमु येणार 
चांदूर रेल्वे – (विशेष प्रतिनिधी ) 
रोज अनेक लोकांना रक्ताची आवश्यकता भासत असते. मात्र त्या प्रमाणात रक्ताचा पुरवठा होऊ शकत नाही. जिल्हा सामान्य रूग्णालयात सुध्दा रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुडवडा भासत असल्याची चांदूर रेल्वे येथील माहिती पत्रकार संघाला मिळाली होती. याचीच दखल घेत स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन आज १८ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघ, शाखा चांदूर रेल्वे व स्व. मदनगोपाल मुंधडा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक मुंधडा महाविद्यालयात सकाळी १० वाजतापासुन आयोजित रक्तदान शिबीरात प्रमुख पाहुणे म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश शिंगटे, उपविभागीय अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे, तहसिलदार बी. एन. राठेड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री. नांदुरकर आदींची उपस्थिती राहणार आहे. अपघातामुळे किंवा एखादी छोटी शस्त्र-क्रिया करण्यासाठी, किवा कोणत्याही आजारपणामुळे मानवाला रक्ताची गरज हि दुसऱ्या व्यक्तीकडून भासते. कारण हा जीवन मरणाचा प्रश्न असतो. त्यामुळेच रक्तदानाला विशेष महत्व आहे. आपल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचतोय हि भावना खरच खूप सुखावणारी असते. रक्तदान करणे हे माणुसकीचे खऱ्या अर्थाने कर्तव्य आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना सतत अनेकांच्या मनात असचे. अनेक प्रकारच्या समाजहितैषी कार्यातून समाजाचे ऋण अनेकजण फेडतात. रक्तदान हे त्यापैकीच एक आहे. रूग्णाला रक्त लागल्यास रक्ताच्या बाटलीसाठी नातेवाईकांना वणवण भटकावे लागते. अनेक ठिकाणी रक्तदानातील तरुणांचा सहभाग निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळे आज आयोजित रक्तदान शिबीरात जास्तीत जास्त युवक – युवती, नागरीकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाचे विदर्भ कार्यकारीणी सदस्य प्रभाकरराव भगोले, उत्तमराव गावंडे, केंद्रिय कार्यकारीणी सदस्य युसुफ खान, जिल्हाध्यक्ष प्रा. रविंद्र मेंढे, जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब सोरगिवकर, चांदूर रेल्वे तालुकाध्यक्ष गुड्डु उर्फ प्रविण शर्मा, उपाध्यक्ष अभिजीत तिवारी, विनय गोटफोटे, सचिव संजय मोटवानी, सहसचिव इरफान पठान, कोषाध्यक्ष अमर घटारे, अमोल गवळी, मंगेश बोबडे, विवेक राऊत, धिरज नेवारे, मनिष खुने, राजेश सराफी, शहेजाद खान, राहुल देशमुख यांसह मुंधडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत कारमोरे आदींनी केले आहे. या शिबीरात रक्तदानाच्या संपुर्ण प्रक्रियेसाठी अमरावती सामान्य रूग्णालयाची चमु येणार आहे.