सामाजिक कार्यकर्ता निशिकांत बडगे अकोला भूषण पुरस्कार 2018 ने सन्मानित

0
967
Google search engine
Google search engine

अकोला/ संतोष विणके सामाजिक;सांस्कृतिक ;शिक्षण;आरोग्य आदी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना
वंदे मातरम संघटना अकोला कडून देण्यात येणारा सन्मानाचा अकोला भूषण पुरस्कार 15ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी सामाजिक कार्यकर्ता निशिकांत बडगे यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

72 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ऎतिहासिक 72 ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे हस्ते रक्तदान;नेत्रदान;वृक्ष संवर्धन जल जागर व इतर सामाजिक जाणीव ठेवून जगणारे सामाजिक कार्यकर्ते निशिकांत बडगे यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र शाल श्रीफळ देऊन अकोला भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर; प्रा. संजय खडसे,प्रा. संतोष हुशे ;उमेश मसने; प्रा.बाठे सर यांच्यासह अनेक गणमाण्य व्यक्ती; वंदे मातरम संघटना अकोला चे पदाधिकारी उपस्थित होते.या पुरस्काराने सामाजिक चळवळीत काम करण्यासाठी ऊर्जा मिळाल्याचे पुरस्कार प्राप्त अकोला भूषण निशिकांत बडगे यांनी प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.कार्यक्रम संचलन धनंजय मिश्रा तर आभार संदीप देशमुख यांनी मानले .कार्यक्रमाला बहूसंख्य नागरिक उपस्थित होते.