पैठण येथे चौदावे राज्यस्तरीय कामगार भजन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

0
661
Google search engine
Google search engine

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कामगार कल्याण मंडळाचा उपक्रम

 बीड :नितीन ढाकणे

:महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार व कामगार कुटुंबीयांसाठी चौदावे राज्यस्तरीय कामगार भजन प्रशिक्षण शिबीर श्रीक्षेत्र पैठण येथे २३ ते २६ आॅगस्ट २०१८ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

चार दिवस चालणाऱ्या या भजन प्रशिक्षण शिबीरात पारंपारीक भजन पद्धती, वारकरी भजन, संगीत भजन, चक्रीय भजन, भक्तीचे मार्ग, किर्तनाचे मुल्य, महाराष्ट्रातील संत परंपरा, भजन व ज्ञानविज्ञान, संतानी निर्माण केलेले वाड़मय, भारतीय संस्कृती आदी विषयांवर प्रविण महाराज गोसावी, दुर्गाताई पोकळे, प्रदीप कुमावत, रखमाजी नवले, नवनाथ आंधळे, बळीराम जोगस, विष्णुशास्त्री साळुंके, नामदेव पोकळे, विठ्ठलशास्त्री चवघटे, जगदीश आचार्य, शामराव साळुंके,संतोष गारूळे, विष्णु गायकवाड, विजयकुमार फड हे तज्ञ भजन प्रशिक्षणात मार्गदर्शन करणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी, पोलिस निरीक्षक चंदन इमले, कल्याण आयुक्त सतीश दाभाडे, औरंगाबाद विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या भजन प्रशिक्षण शिबिरात परळीतील कामगारांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन केंद्र संचालक आरेफ शेख यांनी केले आहे.