विरसेने कडून वाहिली श्रद्धांजली

0
634

दि. 18.08.2018 रोजी विर सेना संघटना चांदुर बाजार च्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत श्रेद्धय मा. अटलबिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच आपला नगरितील देश गौरव कॅप्टन (विरचक्र) प्राप्त दादारावजी रामाजी घोडेस्वार असलेले यांचे दिनांक 17 ऑगस्ट ला दुपारी 2 ते 2.30 दरम्यान दीर्घ आजाराने आणि वृद्धपकाळाने निधन झाले दादारावजी घोडेस्वार हे वयाच्या 17 वर्षी भारतीय लष्करात भर्ती झाले होते त्यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान, भारत विरुद्ध चीन,भारत विरुद्ध पाकिस्तान अश्या तीन युद्धामध्ये आपली कामगिरी पार पाडली. अशा दोन्ही महामानवाना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली . त्या वेळी गावातील सन्माननीय व्यक्ति तसेंच विरसेने चे सर्व कार्यकर्तै उपस्थित होते.