दरोडेखोरांनी गोळीबार करुन सराफ दुकान लुटले.

0
813

निफाड :- प्रतिनिधी

कोपरगांव सहकारी साखर कारखान्यापासून अर्धा कि. मी. वर असलेल्या कोळपेवाडी गावात असलेले शाम घाडगे (संगमनेरकर) यांचे लक्ष्मी ज्वेलर्स हे सराफी दुकान आज दि.19 ऑगस्ट 2018 रोजी सांयकाळी 7.30 वाजता 10 ते 12 दरोडेखोरांनी गोळीबार करून लुटले.
आज कोळपेवाडी येथील बाजार होता.सांयकाळी 7.30 वाजता 10/12 दरोडेखोरांनी दुकानात गोळीबार केला गोळीबारात मालक शाम घाडगे हे ठार झाले व गणेश घाडगे जखमी झाले. गोळीबाराच्या दहशतीने लोकांची पळापळ झाली.संपूर्ण दुकान लुटून नेले. घाडगे हे संगमनेरचे आहेत.