संत्रा फळाची गळ थांबविण्या साठी फवारणी करा.   

0
3538
Google search engine
Google search engine

संत्रा फळाची गळ थांबविण्या साठी फवारणी करा.       शेतकर्यांना केंद्रीय फळ संशोधन संस्थेचा सल्ला

चांदूर बाजार/प्रतिनिधी

आँगष्ट , सप्टेंबर महिन्यात तापमानात वाढ झाल्यास संत्रा पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होऊ शकते.सध्या अमरावती जिल्ह्यात संत्राफळ मोठ्या प्रमाणात होत असल्याचे,आमच्या पाहणीत दिसून आले. सबब शेतकऱ्यांना आपल्या आंबिया व म्रुग बहाराचे संरक्षण करणे गरजेचे झाले आहे. होणारी संत्राफळगळ थांबविण्यासाठी पुढील फवारणी तातडीने करावी. असा सल्ला नागपूर च्या केंद्रिय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एम.एस.लदानिया यांनी एका प्रसिद्धी पत्रका व्दारे,तालुका कृषी कार्यालया मार्फत शेतकर्यांना दिला आहे.                                                                          ****बुरशीजन्य रोगांसाठी, बुरशीनाशका सोबत 2 – फोर डी,जिबरेलीक अँसिड, पोटँशियम नायट्रेट, च्या फवारण्या करणे आवश्यक आहे.त्यासाठी 100 लिटर पाण्यात, जिबरेलीक अँसिड दीड ग्राम ,बोरीक अँसिड 300ग्राम ,कँलशियम नायट्रेट दीड किलो घेऊन तातडीने पहिली फवारणी घ्यावी. त्यानंतर 15 दिवसांनी पुन्हा बुरशीनाशका सोबत, 2 -फोर डी दीड ग्राम,बोरीक अँसिड 300ग्राम,0ः52ः34 दीड किलो 100लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
तसेच कोरड्या व दमट वातावरणात संत्रावर माइट्स चा प्रादुर्भाव होऊन,आंबिया व म्रुग बहाराचे फळावर लाल चट्टे होउ शकतात. त्यानेही फळगळ होऊ शकते. त्यासाठी 100लिटर पाण्यात, डायकोफाँल 200 ग्राम किंवा प्रोपरगाईट 150 ग्राम मिसळून फवारणी करावी.अशा दोन फवारण्या करणे आवश्यक आहे. माइट्स चा प्रादुर्भाव होण्या आधीच ह्या फवारण्या कराव्यात. माइट्स चा प्रादुर्भाव झाल्या नंतर फवारणी केल्यास ,त्याचा फारसा फायदा दिसून येणार नाही. त्यासाठी माइट्स येण्या आधिच फवारणी आवश्यक आहे. *****मागील 10 -12 वर्षात अमरावती जिल्ह्यात बर्याच  ठिकाणी ग्रिनींग जिवाणू चा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यासाठी पुढील प्रमाणे फवारणी करणे आवश्यक आहे.100लिटर पाण्यात, जिबरेलीक अँसिड दीड ग्राम,बोरीक अँसिड 300 ग्राम,कँलशियम नायट्रेट दीड किलो , अँन्टिबायोटिक रेस्टोक्लिन 60ग्राम या प्रमाणे पहिली फवारणी करावी.त्यानंतर 15 दिवसांनी  2 – फोर डी दीड ग्राम ,बोरीक अँशिड 300 ग्राम 0ः52ः34 दीड किलो ,ट्रेप्टोसायक्लिन 10 ग्राम ,100 लिटर पाण्यात घेऊन दूसरी फवारणी करावी.                 *****तसेच झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, व मँगनीज सल्फेट,प्रत्येकी 100ग्राम प्रतिझाड प्रमाणे देणे.त्याच प्रमाणे गरज भासल्यास संत्रा झाडांना ,जमिनिच्या मगदूरा प्रमाणे नियमिय पाणी सुरू ठेवावे.या प्रमाने उपाय केल्यास संत्राफळांची गळ बर्याच प्रमाणात कमी होऊ शकते.