अकोट शहर पोलीसांचा कारवाईचा धुमधडका >< देशी कट्टा व जिवंत काडतुसासह एकास पकडले

0
1208
Google search engine
Google search engine

अकोट (प्रतिनीधी)- आकोट शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे नेतृत्वात शहर पोलिसांनी कारवाईचा धुमधडका सुरूच ठेवला असून दिनांक 19।8।18 रोजी रात्री पोलीसांना खात्री लायक माहिती मिळाली की स्थानिक कबूत्तरी मैदान येथे एक व्यक्ती संशयास्पद स्थिती मध्ये असल्याची माहिती मिळल्यावरून अकोट शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड , पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गवई,पोलिस कर्मचारी संजय घायल, उमेश सोळंके, जवरीलाल जाधव, विरु लाड ह्यांनी पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनात त्वरित कबूत्तरी मैदान येथे धाव घेऊन तेथे संशयास्पद स्थिती मध्ये उभा असलेल्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात एक देशी बनावटीचा कट्टा व एक जिवंत कडतुस मिळून आले.त्या बाबत त्याचे कडे कोणताही वैध परवाना मिळून न आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याचे कडे अवैध शस्र मिळून आल्याने त्याचे कडील देशी कट्टा ,जिवंत कडतूस, एक मोबाइल एकूण किंमत 25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी श्याम उर्फ स्वप्नील पुरुषोत्तम नाठे वय 20 वर्ष राहणार रामटेकपूरा अकोट ह्याचे विरुद्ध पोलिस स्टेशन अकोट शहर येथे अवैध शस्र बाळगल्या ने आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास कामी कोर्टातून त्याचा पोलीस कोठडी मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत, सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक कलासागर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ,ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन शेळके व गुन्हे शोध पथकाने केली.यापुर्वी पन शहर पोलीसांनी शहरातुन सराईत गुन्हेगार पकडलेत.शिवाय शहरातुन पोलीसांनी आतापर्यंत अवैध पणे वापरण्यात येणाऱ्या ६ तलवारी व एक सुरा देखील जप्त करण्यात आला.आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्र तथा जिवंत काडतुस मिळुन आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.