चांदूर रेल्वे नगर परीषदमध्ये प्लास्टीक बंदीविषयी मार्गदर्शन सभा – नागरीकांना दिली माहिती

0
676
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
राज्यात नुकतीच प्लास्टीक व थर्मॉकोल बंदी लागु झाली आहे. शहरात अनेकांना दंड सुध्दा ठोठावण्यात आला. परंतु अजुनही अनेक व्यापाऱ्यांना, नागरीकांना नेमकी बंदी कशावर आहे व कशावर नाही याची माहिती नाही. त्यामुळे याबाबत जनजागृती व्हावी याकरीता नगर परीषदेतर्फे न.प. सभागृहात मार्गदर्शन सभा सोमवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती.
यावेळी आरोग्य निरीक्षक नितीन इमले, कार्यालय अधिक्षक धनराज गजभिये, लेखापाल आनंद ढवळे, कनिष्ठ लिपीक जितेंद्र कर्से आदींनी प्लास्टीक बंदीविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यामध्ये २०० मिली पेक्षा कमी द्रव धारण क्षमता असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पीईटी व पीईटीई बाटल्या तसेच पिण्याच्या पाण्याची पिशवी, हॅन्डल असलेल्या व नसलेल्या सर्व प्रकारच्या प्लास्टीक पिशव्या, शॉपींग बॅग्ज, थर्माकोल व प्लास्टीकपासुन बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणाऱ्या डिस्पोजेबल वस्तु ताट, कप, प्लेटस्, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडे, हॉटेल्समध्ये अन्नपदार्थ पॅकेजींगसाठी वापरले जाणारे प्लास्टीकचे भांडे, वाटी तसेच स्ट्रॉ, प्लास्टीक व थर्माकोलचा वापर सजावटीसाठी बंदी असेल, कंपोस्टेबल प्लास्टीक पिशवी या वस्तुंवर बंदी लावण्यात आली आहे. तर २०० मिली पेक्षा जास्त द्रव धारण क्षमता असलेल्या पीईटी व पीईटीई बाटल्या, विशेष आर्थिक क्षेत्र, निर्यातीसाठी विविक्षित उद्योग आदीमध्ये फक्त निर्यातीसाठी वापरले जाणारे प्लास्टीक आवरणाचे उत्पादन, उत्पादनाच्या ठिकाणी, उत्पादनाच्या प्रक्रियेदरम्यान अनिवार्य वेष्टनसाटी वापरण्यात येणारे ५० माइक्रॉनपेक्षा जास्त जाडीचे व २० टक्के पुनर्चक्रीत प्लास्टिकपासून बनवलेले प्लास्टिक / थर्माकोलचे आवरण व त्यावर पुनर्खरेदी किंमत व उत्पादकाचे नाव, किरकोळ व घाऊक अन्नधान्य व किराणामाल सीलबंद प्लास्टिक पॅकेजिंग / आवरण कि जे ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाड व दोन ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे तसेच त्यावर पुनर्खरेदी किंमत उत्पादकाचे नाव, वन, फलोत्पादन, कृषी घनकचरा या प्रयोजनासाठी लागणारी कंपोस्टेबल प्लास्टीक पिशवी, प्लास्टीकचा एक थर असलेला पुठ्ठा किंवा खोका, दुधाच्या पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारी ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीची प्लास्टीक पिशवी व त्यावर पुनर्खरेदी किंमत व उत्पादकाचे नाव, पुनर्चक्रण होणारे मल्टीलेअर पॅकेजिंग, घरगुती वापराची प्लास्टीक उत्पादने, औषधांचे वेष्टन, वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय उत्पादनांसाठी वापरण्यात येणारे प्लास्टीक, मत्स व्यवसायात मासे टिकवून ठेवण्यासाठी वापरले जाणारे थर्माकोल बॉक्स, पुनर्चक्रण होणारी शैक्षणिक व कार्यालयीन उपयोगाची प्लास्टीक स्टेशनरी उत्पादने, रेनकोट आदी वस्तुंवर बंदी लावण्यात आलेली नाही अशी माहिती देण्यात आली.
या सभेला मंगेश गोकटे, संदिप देशमुख, पप्पु रॉय, रूपेश मते, आकाश देशमुख आदींची उपस्थिती होती.