निफाड शिवसेना व भा.व.सेनेतर्फेे बससेवा सुरू करण्यासाठी खेरवाडीची मागणी

0
812

निफाड(प्रतिनिधी)

नाशिक सिध्द पिंप्री खेरवाडी मार्गे सायखेडा बससेवा पुर्ववत सुरु करण्यासाठी खेरवाडी (नारायणगाव ) शिवसेना तसेच भा.वि.सेनेतर्फे मा. विभागीय नियंञक नाशिक येथे निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी भा.वि.सेना माजी तालुका अध्यक्ष श्री . सुभाष आवारे , शिवसेना शहरप्रमुख सुनिल संगमनेरे , भा.वि. सेना शहरप्रमुख सतिश संगमनेरे यांनी सकाळची विद्यार्थ्यांची खेरवाडी ते सायखेडा बसेवा पुर्ववत करणे तसेच सायंकाळी ६ नंतर नाशिक येथून विद्यार्थी व कामगार यांना खेरवाडी येथे परतीच्या प्रवासासाठी बस पुर्ववत करण्यासाठी वाहतूक नियंञक मा. गणोरे साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा करुन निवेदन देण्यात दिले. या वेळी बससेवा पुर्ववत करण्याचे आश्वासन श्री. गणोरे यांनी दिले. तत्पुर्वी जि.प. सदस्य दिपकभाऊ शिरसाठ व ग्रामपंचायत सरपंच , सदस्य नारायणगाव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी व ग्रामस्थांसमावेत वाहतूक विभागास निवेदन देण्यात आले.