देऊरवाडा परिसरातील नाल्याच्या पुरामुळे शेतातील पीक गेले खरडून,

0
1459
Google search engine
Google search engine

👉🏻देऊरवाडा परिसरातील नाल्याच्या पुरामुळे शेतातील पीक गेले खरडून,
👉🏻14 एकर कपाशी आणि एक एकर हळदीचे नुकसान,11 शेतकऱ्यांना फटका

चांदुर बाजार :-प्रतिनिधी

चांदुर बाजार तालुक्यात 17 ऑगस्ट ला झालेल्या अतिवृष्टीमुळे घरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याचा सर्वाधिक फटका शिरजगाव कसबा व करजगाव मंडळांना बसला आहे.त्याच सोबत शिरजगाव कसबा मंडळातील देऊरवाडा परिसरातील नाल्याच्या पुरामुळे शेतातील पीक खरडून गेले आहे.देऊरवाडा परिसरातील बगाडी व चारगड नाल्याच्या आलेल्या पुरामुळे 20 नजर क्षेत्रात पाणी शिरल्याने पिकाचे नुकसान झाले आहे.या 20 एकरा पैकी 15 एकर पिकाखाली क्षेत्राला पुरामुळे,हानी पोहचली आहे.यात 14 एकर कपाशी व एक एकर हळद पिकाचा समावेश आहे.अतिवृष्टी मुळे आलेल्या या महापुराचा 11 शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
या सर्व शेतकऱ्यांची शेती मौजा वडुरा देऊरवाडा परिसरात आहे .यापैकी ६ शेतकरी यांची शेती देऊरवाडा जवळील वडुरा येथे तर उर्वरित 5 शेतकऱ्यांची शेती देऊरवाडा येथे आहे.यात बगाडी नाल्याच्या पुरामुळे पाच शेतकरी चे पिकाचे नुकसान झाले आहे.तर महादेव दातीर, राजू सिनकर,श्याम सोनार सागर केदार यांच्या शेतातील कपाशी चे पीक खरडून गेले आहे.तसेच याच परिसरातील चारगड नाल्याच्या पुरामुळे साडे नऊ एकरातील कपाशीचे खरडून गेले.यात मौजा वडुरा भागातील अ. रहेमान शे. रहेतमुल्ला ,शे. गफूर,शे. मुनिर,नझिर खा,प्रमोद वानखडे,गोपाल माहुरे, किशोर माहुरे याचे कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शेतातील उभे पीक खरडून गेल्या मूळे या सर्वाचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला.त्यामुळे हे सर्व शेतकरी ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीत प्रशासन कडून आर्थिक मदत येईल काय?या कडे डोळे लावून बसले आहे.

00000

तहसीलदार शिल्पा बोबडे प्रतिक्रिया चांदुर बाजार
*”अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरचे सर्वेक्षण अहवाल पूर्ण झाला आहे.सध्या शेतीच्या नुकसान ची सर्वेक्षण सुरू आहे.अहवाल प्राप्त होताच झालेल्या नुकसान ची माहिती शासनाकडे पाठवून शेतकरी च्या मदतीच्या निधीचे नोंदवण्यात येतील””.*