पशुवैद्यकीय अधिकारी गैरहजर;  दवाखाना वाऱ्यावर ; पशुपालकांची आर्थिक पिळवणूक; आंदोलनाचा इशारा

0
1799
Google search engine
Google search engine

पशुवैद्यकीय अधिकारी गैरहजर;  दवाखाना वाऱ्यावर ;
पशुपालकांची आर्थिक पिळवणूक; आंदोलनाचा इशारा

चांदूरबाजार  प्रतिनिधी बादल डकरे

स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर राहत असून मुख्यालयी राहत नसल्याने पशुपालकांना खाजगी वैद्यकीय डॉक्टर कडे जावे लागत आहे . या पशुपालक कडून हे डॉक्टर जादा पैसे वसूल करत असून आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
स्थानिक पशुवैद्यकीय दवाखाना तील पशुवैद्यकीय अधिकारी च्या दिवसोनदीवास अनेक तक्रारी वाढत आहे . पशुवैद्यकीय दवाखान्यात एकच वैद्यकीय अधिकारी चे पद असताना ते वैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर राहत असून मुख्यलयी सुद्धा राहात नसल्याने तालुक्यातील पशुपालकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. तर अनेकदा खाजगी डॉक्टरांच्या कडे जाऊन त्यांना आपल्या पशूंचा गैरवाजवी पैसे देऊन उपचार करावा लागत आहे.पशुवैद्यकीय अधिकाराच्या गैरहजेरी मुळे अनेकदा वेळीच उपचार न मिळाल्यामुळे अनेक पशु दगावल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखाना हा असून नसल्यासारखा असल्याचा रोष पशुपालक तर्फे वक्त केला जात आहे.
स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यात पशूंच्या पुरेसा औषधीसाठा उपलब्ध असूनही पशुपालकांना मात्र औषध पुरवठा केला जात नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पशुपालकांकडून अनेकवेळा तक्रारी केल्यानंतरही कुठलीही दखल न घेता योग्य उपाययोजना केल्या जात नाही. परिणामी स्थानिक नागरिकांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी विरुद्ध रोष खदखंडात आहे. तसेच पशुवंद्यकीय दवाखान्यात उपलब्ध असणारे कुत्रीम रेतन हे मोठया प्रमाणातया खाजगी डॉक्टरांना पुरविण्यात येत असून स्थानिक पशुपालकांना मोफत मिळणारी ही औषध अवाजवी पैसे देऊन खाजगी डॉक्टरांकडून लागत आहे.
त्यामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर परिस्थिती संदर्भात कोणाला विचारणा करावी हा प्रश्न पशुपालकांना निर्माण झाला आहे. तर अश्या बेजबाबदार पशुवंद्यकीय अधिकारी वर त्वरित कार्यवाही करावी . तसेच पशुपालकांना औषध उपचार अभावी नुकसान होणार नाही याची उपाययोजना करावी अशी मागाणी स्थानिक नगर परिषद चे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी जिल्हाधिकारी अमरावती याना दिलेल्या लेखी तक्रारीत केली आहे. असे न झाल्यास पशुवंद्यकीय दवाखाना वर पशुपालक तर्फे काळा पट्टा मारून निषेध आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.