ताण-तणाव कमी करण्यासाठी नाव ठेवणे थांबवावे, संवाद वाढवावा

0
1112
Google search engine
Google search engine

 

मनोविकार तज्ञ डॉ.सुरेश पाटील यांचे आवाहन

विरुपक्ष शिवाचार्य महाराजांचा अनुष्ठान समिती तर्फे सत्कार

बीड परळी वैजनाथ 

नितीन ढाकणे

ताण-तणाव कमी करण्यासाठी नाव ठेवणे थांबवावे, संवाद वाढवावा, स्पष्ट बोलावे, असे आवाहन मुंबईचे मनोविकार तज्ञ डॉ.सुरेश पाटील यांनी येथे बोलतांना केले. शनिवारी विरुपक्ष शिवाचार्य महाराज मन्मथ धाम यांचे प्रवचन झाले. व 11 ऑगस्ट पासुन सुुरु झालेल्या त्यांच्या प्रवचन मालेची सांगता झाली.
येथील श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट, लिंगायत समाज व भक्तगण परळी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत, वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या 82 व्या श्रावणमास तपोनुष्ठान निमित्त येथील अनुष्ठान मंडपात डॉ.सुरेश पाटील यांचे ताण-तणाव व्यवस्थापन याविषयावर तर मुंबईचे बालरोगतज्ञ डॉ.अमित सांमत यांचे बाल आरोग्य या विषयावर व्याख्यान झाले.
डॉ.सुरेश पाटील पुढे म्हणाले की, गैर समाजाच्या लाटे मध्ये बुडु नका अडचणीला अडचण मानु नका असा सल्ला देऊन त्यांनी नकारात्मकता ऐवजी सकारात्मकतेला प्राधान्य द्यावे असे सांगितले. यावेळी डॉ.अमित सांमत म्हणाले की, बाळाची योग्य काळजी घ्यावी व बाळाला चांगला आहार द्यावा, बाळाला आहार देत असतांना व्यवस्थीत द्यावा.
या व्याख्यानानंतर विरुपक्ष शिवाचार्य महाराज मन्मथ धाम यांचे प्रवचन झाले. व 11 ऑगस्ट पासुन सुुरु झालेल्या त्यांच्या प्रवचन मालेची सांगता झाली. यावेळी विरुपक्ष शिवाचार्य महाराज यांचे तपोनुष्ठान समितीच्या वतीने तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे, चंद्रकांत उदगीरकर, गिरीष बेंबळगे, संतोष पंचाक्षरी, सोमनाथ निलंगे, अ‍ॅड.गिरीष नरवणे, महाराष्ट्र विरशैव सभेचे दत्ताप्पा ईटके, डॉ.सुरेश चौधरी यांनी शाल श्रीफळ देऊन व स्मृती चिन्ह भेट देऊन अशीर्वाद घेतले.
यावेळी डॉ.सुरेश पाटील, डॉ.अमित सामत, डॉ.महादेव तोंडारे, यावेळी शिवराज नावंदे, भगवंतराव पाटील, गोदावरी चौधरी, रमाकांत मुरुडकर, धोंडीराम बिडवे, वैजनाथ आलदे, निलेश कोरे, विजयअप्पा कारसकर, रमा आलदे यांच्यासह इतर उपस्थित होेते. या कार्यक्रमाचे संचलन सोनाली रोडे यांनी केले.
या वेळी रंभापुरी पिठाचे जगद्गुरु श्री विररुद्रमुनी देव यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

तपोनुष्ठान सोहळ्यात आज शिवरंग-श्री शिवशंकर भक्तीचा रंग कार्यक्रम
परळी श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट, लिंगायत समाज व भक्तगण परळी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत, वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या 82 व्या श्रावणमास तपोनुष्ठान निमित्त येथील अनुष्ठान मंडपात सोमवारी दुपारी 4 वाजता पं.डॉ.पराग चौधरी व सौ.मिनाक्षी चौधरी औरंगाबाद यांचा शिवरंग-श्री शिवशंकर भक्तीचा रंग हा कार्यक्रम होणार आहे व शि भ प शेषराव पाटील नांदेड यांचे दुपारी 3 प्रवचन होणार आहे असून रात्री 8 ते 10 वा. शि भ प लक्ष्मण विभूते महाराज माळकोजी यांचे किर्तन होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे व पदाधिकारी यांनी केले आहे