गव्हा फरकाडे येथे वळूची दहशत; तिघे जखमी ठळक मुद्देग्रामस्थ करणार लिलाव : शेतात, शाळेत जाणे बंद

0
1405

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )

अंगात लाल सदरा दिसताच मागे धावणे, शिंग मारणे, बैलबंडी उलटवणे, लहान मुलांच्या मागे धावणे, असा नित्यक्रम येथील वळूचा असल्याने संपूर्ण गाव दहशतीत जगत आहे. आतापर्यंत तिघांना जखमी केल्याने याचा लिलाव करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. अतुल कुलकर्णी अभिनित वळू चित्रपट खूप गाजलो. यामध्ये गावातील वळूमुळे नागरिक कसे भयभीत होतात, हे दाखवले असून, वळूचे सुंदर चित्रीकरण करण्यात आले आहे. असाच काहीसा प्रकार चांदूर रेल्वेवरून १८ कि.मी. अंतरावरील गव्हा फरकाडे येथे रोज घडत आहे. त्याने दोन दिवसांत तीन शेतकऱ्यांना गंभीर जखमी केले. एका वळूमुळे संपूर्ण गाव भयभीत झाला आहे.

गव्हा फरकाडे हे तीन हजार लोकवस्तीचे हे गाव असुन तीन वर्षांपूर्वी एक वळू (सांड) कुणीतरी गावात आणून सोडला. तीन वर्षांचा मंदिराजवळ दिवसभर राहणाऱ्या वळूला शेतकरी दररोज चारा टाकायचे. आता याच वळूने गावातच उद्रेक केला आहे.
शेतातून बैलबंडी आली की तो बैलांना मारल्याशिवाय राहत नाही. लाल रंग दिसताच तो चौताळतो. शाळेतील मुलाच्या मागे धावतो. शेतात महिला कामावर जात असल्यास त्यांच्यामागे वळू धावत असल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहे. त्यामुळे या वळूचा ग्रामवासी लिलाव करणार असल्याचे समजते.