बालनिरक्षण गृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यास लाच घेताना रंगेहाथ अटक

0
873
Google search engine
Google search engine

अनिल चौधरी, पुणे :

नाशिक येथील बालनिरक्षणगृहात असलेल्या एका अल्पवयीन मुलाच्या नातेवाईकडे लाचेच्या स्वरूपात कॅरेम बोर्डाची मागणी करणाऱ्या नलिनी काशिनाथ पाटील अधिक्षिका आणि प्रशांत उत्तम देसले लिपिक नेमणूक बालनिरक्षण गृह उंटवाडी, नाशिक, यांना त्यांच्या कार्यालयात लाच स्वीकारताना रंगेहाथ लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडण्यात आले आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी कि, नाशिक येथील मा.बाल न्यायालय मंडळाच्या आदेशाने  एका अल्पवयीन मुलास बालनिरक्षण गृहात दाखल केले होते. त्यास मा.बाल न्यायालय मंडळ कोर्टातून जामीन करुन घेण्यासाठी बालसुधारगृह अधीक्षक यांचेकडून पीओ लेटर देणेकरीता व जामीन मिळाल्यानंतर ,सहकार्य करुन मुलास सोडण्याकरीता बालसुधारगृह अधिक्षिका नलिनी काशिनाथ पाटील व लिपिक प्रशांत उत्तम देसले यांनी लाचेच्या स्वरूपात कॅरेम बोर्डची मागणी करून सदर कॅरेम बोर्ड बाल निरीक्षणगृह उंटवाडी नाशिक अधिक्षिका कार्यालयामध्ये स्वीकारत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. आहे.

सदरची कारवाई नाशिक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली .

कोणत्याही शासकीय, निमशासकीय ,खाजगी अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करत असतील तर नागरिकांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री.क्रमांक १०६४ या नंबर करावी , तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येते असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.