बुलडाणा अर्बन कडून आकोट शहर पोलिस स्टेशनला बॅरिकेट प्रदान

0
957
Google search engine
Google search engine

अकोट (संतोष विणके)- आकोटातील रस्त्या मुळे शहरात वाहतुकीची समस्या गंभीर आहे, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी शिवाजी चौक, सोनू चौक, यात्रा चौक अतिक्रमनातून मुक्त करून रस्ते मोकळे केल्याने, नागरिक मोकळा श्वास घेत आहेत, तरी सुद्धा रस्ता दुभाजक नसल्याने बॅरिकेट लावून तात्पुरते रस्ता दुभाजक वाहतूक पोलिसांनी तयार केले आहेत, तसेच जवाहर रोड वर एका बाजूने बॅरिकेट्स लावून त्याच्या आत मध्ये वाहने लावून घेण्यात येत असल्याने ,रस्त्यावर वाहने लावल्याने होणाऱ्या ट्राफिक जाम पासून काही प्रमाणात नागरिकांची सुटका होण्यास मदत होत आहे, मात्र वाहतूक नियोजना साठी अकोट शहरात बऱ्यांच ठिकाणी बॅरिकेट्स ची गरज पडते, आगामी कावड, गणेशोत्सव, दहिहंडी, दुर्गाउत्सव, पोळा, इत्यादी उत्सवाच्या वेळी निघणाऱ्या मिरवणुका व कार्यक्रमा दरम्यान होणारी वाहतूककोंडी व पोलिस कर्मचाऱ्यांची होणारी दमछाक पाहता बॅरिकेट्स ची मदत पोलिसांना व्हावी म्हणून अकोट शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी बुलडाणा अर्बन पतसंस्था शाखा अकोट चे व्यवस्थापक चोपडे ह्यांना लेखी पत्र देऊन विनंती केली होती, त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन बुलडाणा अर्बन च्या मुख्य शाखेकडून मान्यता घेऊन 10 बॅरिकेट्स तयार करून आज दिनांक 23।8।18 रोजी पोलिस स्टेशन अकोट शहर येथे सदर बॅरिकेट्स पोलिसांना प्रदान करण्यात आले, ह्या प्रसंगी पोलिस निरीक्षक गजानन शेळके व बुलडाणा अर्बन परिवारातील गोकुलदास चांडक,अनिल केला,रामेश टावरी, विठ्ठल दळवी,ज्ञानेश्वर चोपडे,प्रशांत गुजर,जितेंद्र कुटे, संजय बुंदेले, संतोष बेलेकर हजर होते, बुलडाणा अर्बन शाखा अकोट ने पोलिसांना बॅरिकेट्स प्रदान केल्याने अकोट शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी बुलडाणा अर्बन च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.