*पोलीस मुख्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाचा अभिनव उपक्रम*

0
966
Google search engine
Google search engine

के.सी.ई. सोसायटी च्या गुरुवर्य प.वि.पाटील प्राथ.विद्यामंदिर जळगाव तर्फे रक्षाबंधन जळगाव जिल्हा पोलिस दलातील बांधवांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मंगलम सभागृह पोलीस मुख्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

क्षणोक्षणी आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या आपल्या पोलीस बांधवांना दीर्घायुष्य लाभो अशी मनोकामना विद्यार्थिनीनी केली.
सर्वप्रथम उपशिक्षिका सौ.कल्पना तायडे यांनी पोलीस नाईक नितीन राणे यांना पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने पोलीस दलाचे स्वागत केले.तसेच पोलीस दलातर्फे शाळेला पुष्पगुच्छ देऊन आयोजित केलेल्या अभिनव उपक्रमाचे अभिनंदन करण्यात आले.
विद्यार्थिनींनी पोलीस बांधवाना सुंदर अशा राख्या बांधून रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे , उपअधीक्षक मतानी साहेब , उपविभागीय अधिकारी सांगळे साहेब , राखीव पो.नि.कावरे साहेब , उपअधीक्षक ( गृह) सुनील कुऱ्हाडे ,पोलीस नाईक नितीन राकेश ,शहर वाहतूक शाखेचे भाऊराव इंगळे , पो.कॉ.धनराज गुळवे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी केले.तर यशस्वीतेसाठी योगेश सुने , सुधीर वाणी यांनी प्रयत्न केले.