अकोटातील शाळा महाविद्यालयात मुलींसाठी तक्रार पेट्या – विद्यार्थिनींनी न घाबरता तक्रार टाकण्याचे ठाणेदार गजानन शेळकेंचे आवाहन

0
840
Google search engine
Google search engine

अकोट (संतोष विणके)- शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे नेतृत्वात अकोटात जननी 2 मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली.पोलिस अधीक्षक राकेश कलासागर ह्यांचे संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ह्या मोहिमे अंतर्गत अकोट शहरात वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले होते.दरम्यान जननी2 मोहीम वर्षभर सुरूच ठेवण्याचा संकल्प पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केला होता.त्या अंतर्गत शहरातील शाळा व महाविद्यलयात मुलींसाठी तक्रार पेट्या लावण्यात आल्या आहेत.या तक्रार पेट्या दर शनिवारी उघडण्यात येतात व त्या मध्ये काही तक्रार असल्यास त्याची नोंद वेगळ्या रजिस्टर मध्ये घेण्यात येऊन तक्रारींचे स्वरूप पाहून व सत्यता पडताळून त्वरित कार्यवाही करण्यातयेणार असल्याचे ठाणेदार शेळके यांनी सांगतले. यासाठी पोलिस नाईक सुरज निंबाळकर ह्यांचे नेतृत्वात एक पथक तयार करण्यात आले असून हे पथक शाळा महाविद्यलया ना भेटी देऊन त्यांचे सतत संपर्कात राहतात. तसेच शाळा महाविद्यालयात लावण्यात आलेल्या तक्रार पेट्या दर शनिवारी शाळा व्यवस्थापनातील व्यक्ती समोर उघडल्या जातात. तक्रार असल्यास त्याची नोंद घेऊन उचित कार्यवाही साठी पोलिस निरीक्षक ह्यांचे समोर तक्रारी ठेवण्यात येतात, तक्रार पेट्या लावल्या पासून आज पावेतो एकही तक्रार कोणत्याही तक्रार पेट्या मध्ये मिळून आली नाही,मात्र विद्यार्थिनीनि कोणालाही न घाबरता तक्रार तक्रार पेटीत टाकावी.कींवा तक्रार पथक अथवा पोलीस स्टेशनशी संपर्क करावा.तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.त्यामुळं मुली तथा महीलांनी निसंकोचपने आपल्या तक्रारी पोलीसांजवळ सांगाव्यात. असे आवाहन पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले आहे.