मोर्शी येथील खुले कारागृहात १५१ कैद्यांना राखी बांधून  रक्षाबंधन उत्साहात – भारतीय महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी बंदी जणांना बांधल्या राख्या

0
3070
Google search engine
Google search engine

खुल्या कारागृहात भारावले कैदी बांधव

भारतीय महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचा २००८ पासून उपक्रम सुरू

रुपेश वाळके / विशेष प्रतिनिधी –

मोर्शी येथील खुले कारागृह येथे भारतीय महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने बंदी बांधवांना या राखी बांधण्याचा कार्यक्रम खुले कारागृह स्थापन झाल्यापासून सण २००८ पासून सतत ११ व्या वर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन करून असा उत्कृष्ट उपक्रम राबवित आहे . भावाच्या नात्याला जीवापाड जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन. पण हातून गुन्हा घडल्याने घरापासून, समाजापासून दूर गेलेल्या तुरुंगातील कैद्यांना नात्या-गोत्याचा काय संबंध ? अशी भावना समाजात आहे. पण मोर्शी येथील खुल्या कारागृहात बंदिवासात असणाऱ्या बंदी गुन्हेगारांसाठी एक अभिनव रक्षाबंधन पार पडले. कारागृहात बंदी असणाऱ्या १५१ पुरुष कैद्यांना राखी बांधून रक्षण करण्याचे वचन घेतले. या उपक्रमात स्थानिक महाविद्यालयाच्या विद्यर्थ्यांनीही सहभाग घेतला.

गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षा भोगत असणारे बंदी या कारागृहात आहे. कुणी खुनाच्या गुन्ह्यात तर कुणी चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. घरापासून व समाजापासून तुटलेल्या या बंदींना मानवतेचा दृष्टिकोन ठेऊन कारागृह राष्ट्रीय सेवा योजना पथक भारतीय महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी बहिण आणि भाऊ मिळवून दिले आहेत. कित्येक वर्षांपासून घर न पाहणारे तुरुंगातील बंदी या अभिनव उपक्रमाने चांगलेच भारावले आहेत. रक्षाबंधन हा अभिनव उपक्रम खुले कारागृहात घेण्यात आला. बंदी पुरुषांना राखी बांधली. यावेळी मिठाईचेही वाटप करण्यात आले. कारागृहात राष्ट्रीय सेवा योजने तर्फे कैद्यासाठी रक्षाबंधन कार्यक्रम घेऊन मानव अधिकार काय असू शकतात याचेच उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.

गुन्हेगारीचा शिक्का बसल्याने त्यांच्याशी हातमिळवणी करण्यास टाळाटाळ होते पण न्यायालयीन बंदीच्या हातावर राखी बांधत आगळ्या वेगळ्या प्रकारे राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. तब्बल १५१ बंदिजनांनी आज हातावर राखी बांधलेली मनगटे उंचावत.. आता ही मनगटे उठतील तर चांगल्या कामासाठीच अशी शपथ घेतली आणि वातावरण भावनिक झाले. आयुष्यात कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यांनी बरबटलेले राकट हात आज एका ‘राखी‘ पुढे लीन झाल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने खुल्या कारागृहात ‘रक्षाबंधन‘ उपक्रमाचे आयोजन केले होते. या हळव्या उपक्रमाला साथ कॉलेजच्या विद्यार्थिनींनी दिली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय महाविद्यालयाचे प्राचार्य जी एस मेश्राम , खुले कारागृह अधीक्षक ए व्ही मलवाड , प्रवीण मोडकर , उपस्थित होते . यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रोहितप्रसाद तिवारी , प्रा डॉ शिरीष टोपरे , प्रा इंगळे ,प्रा डॉ जे एल रामटेके , प्रा पांडे , रुपेश मेश्राम , राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ संदीप राऊत , , बळीराजा संत्रा उत्पादक संघाचे अध्यक्ष रुपेश वाळके , राहुल हगवणे , यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात करून १५१ बंदी जणांना व तुरुंग कर्मचारी यांना राखी बांधून कार्यक्रम साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोजीतप्रसाद तिवारी संचालन प्रा डॉ जे एल रामटेके , आभार प्रदर्शन प्रा डॉ संदीप राऊत यांनी केले .

बहिणींचे प्रेम पाहून कारागृहती कैदी ही भारावले

कार्यक्रमाच्या वेळ कारागृहात परिस्थितीच अशी होती की कारागृहातील कैद्यांनी मनोगत व्यक्त करताना आमच्याकडून चुका झाल्या. पण आज या भगिनींनी आमच्या मनगटावर राखी बांधून आम्हीही माणूस असल्याची जाणीव करुन दिली, जबाबदारीची जाणीव करुन दिली आहे असल्याची भावना व्यक्त केली आणि कारागृहातील कैद्यांचे हृदय भरून आले आणि त्यांना अश्रू अनावर झाले .