मिनी मंत्रालय असणाऱ्या जि.प.आणी पं स.निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर , ग्रामिण भागात राजकीय रणधुमाळीस सुरवात

0
817

आकोट (प्रतीनिधी)- येत्या जि.प. आणी पं स. निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत संपन्न झाली.यात जिल्हाभरातील गण व गटांसह आकोट तालुक्यातील ८ जि.प सर्कल तथा १६ पं स.सर्कल साठी आरक्षण सोडत पार पडली.आज दिनांक 27 ला अकोट पंचायत समिती च्या निर्वाचित गणाचे आरक्षण काढण्यात आले. सोडत अशोकराव अमानकर, प्रभारी उपविभागीय अधिकारी अकोट तथा उपजिल्हाधिकारी रोहयो अकोला यांच्या प्रमुख उपस्थितीत व .विश्वनाथ घुगे तहसिलदार अकोट यांनी काढले. आरक्षण सोडतीच्या चिठ्या चि. आदित्य तेलगोटे वय 13 वर्षे यांने काढल्या तर सदर सोडतीकरिता प्रभारी गटविकास अधिकारी पं. स.अकोट श्री.गठेकर , नायब तहसीलदार राजेश गुरव, संजय गांधी विभागाचे नायब तहसीलदार जगदीश मंडपे, मंडळ अधिकारी राजेश बोडखे, निवडणूक विभागाचे अव्वल कारकून विलास टोलमारे, संगणक परिचालक सिद्धांत वानखडे व तालुक्यातील सर्व नागरिक, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.गण तथा गटांचे नव्याने झालेल्या फेररचने नंतर होणारी ही पहीलीच निवडणुक असणार असुन आरक्षण सोडतीमुळे अनेक ठीकाणची राजकीय समीकरणे बदलली आहेत.त्यामुळं फेररचना तथा आरक्षणावर आक्षेप नोंदवत स्थगीती आणण्याची शक्यता नाकारता येत नाही.